ढाक्यातील ओलिसनाट्य संपुष्टात; 6 दहशतवादी ठार
ढाका, दि. 02 - बांगलादेच्या ढाका शहरातील गुलशन परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये गेल्या 13 तासांपासून चालू ओलिसनाट्य संपुष्टात आणण्यात बांगलादेशी कमांडोंना यश आले आहे. बांगलादेश कमांडोंनी कारवाई करत 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या 18 जणांची सुटका सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांनी आपले कर्तव्य चोख पार पाडल्याचे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे.
ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांनी परदेशी नागरिकांसह 18 जणांना ओलिस ठेवले आहे. यात एका भारतीय नागरिकासह जपान, अर्जेंटिना, इटली या देशांतील नागरिकांचाही समावेश होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांकडून हा हल्ला घडविण्यात आला आहे.
ढाक्यातील अति सुरक्षा असलेल्या गुलशन परिसरातील रेस्टॉरंटला लक्ष्य केले. शुक्रवारी रात्री बंदुकधार्यांना या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करत नागरिकांना ओलिस ठेवले होते. गेल्या 13 तासांपासून नागरिकांना सुखरुप सोडविण्याचा प्रयत्न सुरु होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.