Breaking News

महाबळेश्‍वर येथे 24 तासात 195 मिमी पाऊस

अलिबाग, दि. 2 -  महाबळेश्‍वर येथे शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासात झालेला 195 मिमी पाऊस पडला आहे. तसेच शनिवार सकाळपासून सुरु असलेली पावसाची संततधार व 24 ता
सात महाड मध्ये झालेला 159 मिमी व पोलादपूर मध्ये झालेला 127 मिमी पाऊस व सकाळी 9.45 वाजता अरबी समुद्रातील भरतीमुळे महाबळेश्‍वरमध्ये उगम पाऊन महाड तालुक्यांतून वाहात जावून आंबेत(श्रीवर्धन) येथे समुद्रास मिळणार्‍या सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. शनिवारी सकाळी 8 वाजता सावित्री नदी जल पातळी 6.30 मिटर झाली आहे. या नदिची धोकादायक जलपातळी 6.50 मिटर आहे. परिणामी महाड शहारातील सुकटगल्ली(बाजारपेठ), बिरवाडी हायकल-सफर केंद्र मार्ग, नांगलवाडी एमआयडीसी मार्ग, आदी परिसरात सावित्री नदीच्या पूराचे पाणी घुसण्यास प्रारंभ झाला आहे. आपत्ती नियंत्रण यंत्रणेस सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.