Breaking News

यवतमाळमध्ये दर्डांविरोधात आंदोलन

दर्डा शिक्षण संस्थेच्या स्कूलमध्ये मुलींचे लैंगिक शोषण
संतप्त नागरिकांकडून घोषणाबाजी आणि तोडफोड

यवतमाळ, दि. 02 - जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये दोन शिक्षकांनी शाळकरी मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधील पालक आणि नागरिक एकत्र आले आहेत. संतप्त नागरिकांनी दर्डांविरोधात घोषणाबाजी करत जवाहरलाल दर्डांच्या प्रेरणास्थळाची तोडफोड केली आहे.
संतप्त महिला पालकांनी किशोर दर्डा यांच्या घराबाहेर बांगड्या फोडून निषेध दर्शविला आहे. किशोर दर्डा हे पब्लिक स्कूलचे सचिव आहेत. दरम्यान, याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. तसेच, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल आणि दोषींना कडक शिक्षा होईल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
जवाहलरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालित इंग्रजी माध्यमाच्या यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) या शाळेतील सहा वर्षे वयाच्या  विद्यार्थिनीचा लैंगिक छळाच्या आरोपाप्रकरणी याच शाळेतील यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर या दोन शिक्षकांना अटक करण्यात आलेली आहे.