प्रलंबीत अर्ज 21 दिवसात निकाली काढावेत : मुद्गल
सातारा, सांगली / दि. 7 (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेबपोटलवरील दाखल झालेल्या तक्रारी 21 दिवसांच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे. ज्या विभागाचे अर्ज प्रलंबित आहेत ते निकाली काढावेत. त्याचबरोबर लोकशाही दिनात दाखल होणार्या अर्जांवर 30 दिवसात कार्यवाही अपेक्षित आहे. कोणत्याही तक्रारी प्रलंबित ठेवू नका, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये महावितरणकडील 1 तक्रार अर्ज प्राप्त झाला. आजच्या लोकशाही दिनामध्ये अधिकार्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून हा सोहळा यशस्वी करावा. त्याचबरोबर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून दर्डी कोसळण्यासारख्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. आपत्ती सांगून येत नाही. येणार्या आपत्तीला एकजुटीने सामोरे गेल्यास होणारे नुकसान टाळू शकतो. त्यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, भयमुक्त वातावरणात जिल्ह्यात काम करु. सरकारी कर्मचार्यांच्यावर हल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी कुणी घाबरु नये. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. आपापसात चांगला समन्वय ठेवावा.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपणा सर्वांची मदत लागणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा हागणदारी मुक्त जिल्हा आपल्याला करावयाचा आहे, त्यासाठह सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे. तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले.