रेती उपस्याने रेल्वे पुलास धोका
प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन होते वाळु तस्करी
परभणी दि. 29 - शहरा जवळील नृसिंह मंंदिरा समोरिल गोदावरी पात्रातिल रेती ऊपसा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने केल्याने पात्रातील रेती अधिक प्रमाणात काढल्यामुळे रेल्वे पुलाजवळ मोठ मोठे खड्डे पडुन रेल्वे पुलाला धोका र्निमाण झाला आहे.शहरा जवळ असलेल्या गोदावरी पात्रामध्येच रेती तस्करांनी जेसीबी यंत्रे लावुन मोठ्या प्रमाणावर वाळु ऊपसा सुरू केल्याने पात्रातील नृसिंह मंदिरा लगत रेल्वे पुलाच्या जवळच शंभर फुटापेक्षाही जास्त मोठे खड्डे होऊन पुलाला धोका निर्माण झाला आहे.या अवैध ऊत्खननामुळे पात्रात जवळपास एक हजारापेक्षा जास्त असे रूंद खड्डे तयार होऊन जागोजागी रेतीच्या धड्या पोखरल्यामुळे रेल्वे पुलास धोका असल्याचे रेल्वे अधिकार्यांनी सांगीतले.या बाबत गंगाखेड तहसिल प्रशासनास वेळोवेळी सांगुनही तहसिल प्रशासनाने रेल्वे पुला जवळील रेती ऊपसा थांबवला नाही असे स्थानिक रेल्वे प्रशासनाने बोलुन दाखवले.पहाटे 5 वाजे पासुन या पुल परिसरातुन परवाना धारक कंत्राटदार रेती ऊपसा सुरू करतात तर अवैध ऊपसा करणारे वेळेचे कोणतेही बंधन पाळत नसल्याचे दिसुन येते.रेतीच्या या धक्कयामध्ये पहाटे 4वाजे पासुन 50 च्या वर ट्रक/ट्रक्टर दिसुन येतात परंतु हे दृष्य सर्वसामान्यांना दिसतं पण तहसिल प्रशासनाला हे दिसुन येत नाही याचेच नवल आहे.कारण रेती तस्करांसोबत पोलिस व तहसिल प्रशासनातिल काही भ्रष्ट अधिकार्यांनी हात मिळवणी केली असल्याचे तस्करांकडुनच बोलुन दाखवले जात आहे.पात्रात वाळु ऊपसा करणारे सर्चच ट्रक्टर हे विना नंबरचे असुन यांच्यावर या पुर्वीसुध्दा अनेक गुन्हे नोंद झाले आहेत पण दंड भरुन पुन्हा हेच ट्रक्टर रेतीच्या अवैध ऊपशा साठी जात असल्याचे दिसुन येत आहे.त. रेती तस्करांनी आपला मोर्चा शहराजवळील पात्राकडे वळविला हि बाब चिंतेची आहे.या रेती तस्करांना राजकिय वरदहस्त आसल्याने तहसिल व पोलिस प्रशाशन हतबल आसल्याने त्यांनी हि कमाई करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी गोदावरी पात्र मात्र चाळणी होत आहे.या साठी जिल्हाधिकार्यांनी शहराजवळील पात्रातिल रेती ऊपसा त्वरीत थांबवावा व या सैराट झालेल्या वाळुमाफीयांना आवर घालुन गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.