Breaking News

संत जनाबाई कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची दुसर्‍यांदा परीक्षा

पाली विषय बंद करण्याचा घातला घाट

गंगाखेड प्रतिपिधी ः दि. 29 - आकरावीतील विद्यार्थ्यांनी एप्रिल 2016 मध्ये पाली विषयाची परीक्षा घेण्यात आली होती.बारावी मध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रीया सुरू असतांना या सर्व विद्यार्थ्यांची दि.27 जुन रोजी दुसर्‍यांदा मराठी,हिंन्दी विषयाची परीक्षा घेण्यात आली.केवळ पाली विषय बंद करण्यासाठी हा सर्व खटाटोप संचालक मंडळाच्या आदेशा वरुन केल्याचे ऊघड झाले आहे.
संत जनाबाई महाविद्यालया मध्ये 12 वी ची प्रवेश प्रक्रीया सुरू झाली असतांना अकरावीतील जवळपास शंभरावर विद्यार्थ्यांनी एप्रिल 2016 मध्ये पाली विषय धेवून परीक्षा दिली होती.पाली विषयाचे प्रा.पी.जी.खैरे त्यांच्या थकित वेतनासाठी मा.ऊच्च न्यायालयात गेले होते,प्रा.खैरे यांच्या बाजुने खंडपिठाने निर्णय दिला असुन सदर वेतन त्यांना अदा करण्याचे  आदेश निर्गमित केले आहेत सदरील वेतनाची रक्कम मोठी असुन या शिवाय प्रा.खैरे संस्थेच्या  विरोधात न्यायालया पर्यंत गेल्याचा राग मनामध्ये ठेवून पाली भाषाच कॉलेज मधुन हद्दपार करण्याचा डाव संचालक मंडळाने केल्याचे ऊघड झाले आहे.परीनामी चालु शैक्षणीक वर्षात बारावी मध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना पाली विषयात अ‍ॅडमिशन न देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे.,या मुळे एप्रिल 2016 मध्ये अकरावीतील पाली परीक्षा घेणार्‍या सर्च विद्यार्थ्यांचे बारावी प्रवेश थांबविण्यात आले आहेत. या साठी त्यांना पुठील प्रवेशा साठी दि.27 जुन रोजी कॉलेजच्या 9 नंबर हॉल मध्ये हिंन्दी व मराठी विषयाची परीक्षा घेण्यात आली.या हॉल मध्ये सुमारे शंभरच्यावर विद्यार्थ्यानी परीक्षा दिली असुन अनेक विद्याथ्यांचा अभ्यास नसल्यामुळे  ऊत्तर पत्रीकेवर केवळ नाव व नंबर टाकुन विद्यार्थ्यांनी गप्पा टप्पा मारल्या तसेच याच विद्यार्थ्यांनी या पुर्वीच हि परीक्षा दिल्यामुळेही केवळ खानेसुमारी पुर्ण करून संचालक मंडळाचे आदेशाचे पालन केले.या अगोदरही विद्यार्थ्यांनी पाली विषय बंद करू नये म्हणुन शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देवुन आंदोलन पुकारले होते.आकरावीच्या विद्यार्थ्यांची दुसर्‍यांदा परीक्षा घेणार्‍या या गैर कायद्याच्या संचालक मंडळावर शिक्षणाधिकारी काय कारवाई करणार या कडे संपुर्ण गंगाखेधडकरांचे लक्ष लागले असुन झालेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडुन होत आहे.