Breaking News

लिंग आणि भस्माचे विरशैव समाजात अनन्य साधारण महत्व-शिवलिंग शिवाचार्य

परभणी, दि. 29 - विरशैव समाज आयोजित मासिक सत्संग  राष्ट्रसंत डॉ.शिवलिग शिवाचार्यमहाराज अहमद्पुरकर हे सोनपेठ शहरात महालींग स्वामी यांच्या निवास स्थानी आगमन होताच फटाक्याच्या आतिष बाजीत भव्य-दिव्य स्वागत करून सौ. शैला महालिंग स्वामी व सौ. मयुरी अम्रत स्वामी यांनी सह कुटुंब सह परिवार महाराजांची पादपूजा करून सर्वांनी पुष्प-हार अर्पण करून सत्कार केला, तसेच महाराजांनी त्यांचे सोमेश्‍वर बॅग सेंटर ला भेट दिली. सत्संग कार्यक्रमश्री नगरेश्‍वर मंदिर येथे सातवे पुष्प गुंफताना त्यांनी लिंग आणि ेभस्माचे विरशैव समाजात अनन्य साधारण महत्व सविस्तर विवेचन करून स्पष्ट केलेयावेळी तालुक्यातून विरशैव समाजाचे तमाम बंधू ,भगिनी व मित्र परिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमा नंतर महाप्रसाद वाटप झाला यावेळी  सोनपेठ विरशैव समाज बांधव तसेच संभाजीनगर मित्र मंडळानी  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले.