Breaking News

साबांची इभ्रत प्रसारमाध्यमांच्या चावडीवर मांडणारे पडले उघडे

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 03- सार्वजनिक बांधकाम खात्याची अवघी इब्रत प्रसारमाध्यमांच्या चावडीवर मांडण्याची संधी मिळेल अशाच पद्धतीने परिस्थिती  निर्माण करणारे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत प्राप्त झाल्यानंतर साबांत दिवसभर एका गटात स्मशान शांतता पसरली होती. दरम्यान ही  कारवाई लोकमंथनने उपस्थित केलेल्या महापुरूष अवमान प्रकरणी होत असली तरी गेल्या तीन वर्षापासून लोकमंथनने सांबात सुरू केलेल्या साफसफाई  मोहिमेला मिळालेले मोठे यश मानले जात आहे.
साबांत कार्यरत असलेले मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता हांडे, कार्यकारी अभियंता किशोर पाटील,  कार्यकारी अभियंता पी. के. पाटील, ही भुजबळांच्या पदराखाली पोसली गेलेली टोळी भुजबळांच्या पश्‍चातही सांबाच्या इज्जतीचे लचके तोडत आहे. लोकमंथनने या  मंडळींना सांबाच्या गुहेतील 40 चोरांची टोळी असे संबोधून वारंवार त्यांच्या दरोडेखोरीचा पडदा फास केला आहे. महाराष्ट्र सदर घोटाळ्यापासून संप्तश्रुगीं गडावरील  रोपवेपर्यंत, ग्रीन बिल्डींगपासून स्पिल्टप पर्यंत अनेक घोटाळ्यामध्ये या मंडळींचा असलेला सहभाग लोकमंथनने चव्हाट्यावर आणला. मुंबई, पुणे, नाशिक,  औरंगाबाद, अशा विविध सांबा प्रादेशिक विभागातील या मंडळींची ट्रस्ट भागीदारी उघड केल्यानंतरही तत्कालिन सांबा मंत्री आणि विद्यमान इडी ग्रस्त छगन  भुजबळ यांच्या आशिर्वादाने अभय मिळाले. त्यांची ही सवय महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतरही कायम राहिली. लोकमंथनने मात्र आपला पाठपुरावा सोडला नाही.  मुजोपणा इतका वाढला की महापुरूषांच्या अवमान करण्यापर्यंत भ्रष्ट प्रवृत्तींची मजल गेली. गेल्या चार दिवसांपासून या अवमान प्रकरणांची गंभीर दखल घेत  लोकमंथनने बहुजनांची अस्मिता वाचविण्याची लढाई सुरू केली. या लढाईसमोर या  भ्रष्ट प्रवृत्तीला अभय देणारे किंबहुना या मंडळींच्या शकुनीचालीसमोर हतबल  झालेले साबां प्रशासनही शरण आले. आणि अखेर किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळाले. निमित्त अवमान प्रकरणाचे असले तरी किशोर  पाटील यांची अवघी कुंडली तपासून अवघ्या प्रकरणाची शहानिशहा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा सभापतींनाही लावला चुना
साबांतील भुजबळ प्रवृत्तीची पिलावळ किती गेंड्याच्या कातडीची आहे. किंबहुना त्यांची कातडी गेंड्यापेक्षाही टणक असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द  विधानसभा सभापती हरिभाई बागडे यांच्या मतदार संघातही येत आहे. औरंगाबाद साबां प्रादेशिक विभागातील कार्यसंहिता आणि प्रशासकीय नियम धाब्यावर  बसवून कोट्यवधींची हेराफेरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी (फुलंब्री) यांच्या इशार्‍यावर कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर  यांनी प्लॅन-नॉन प्लॅनची तब्बल 90 कोटीची (लेखाशिर्ष 5054/03 - 5054/04, नाबार्ड व रस्त्याची डागडुजी म्हणजे खड्डे भरणे) देयके मार्च अखेरपर्यंत अदा  केली, तर पश्‍चिम विभागात शेंडे यांनी याच प्रकारातील 50 कोटींची बिले अदा करून साबांला शेंडी लावली आहे. यासंदर्भात भाजप, संघ परिवारातील काही  जाणकारांसह सामाजिक कार्यकर्ते परमेश्‍वर नलावडे यांची सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात-
विशेष ः फुलब्री उपविभागात सर्व्हेची कामे मजूर संस्थाच्या नावे तुकडे पाडून (स्पिलटप) करण्यात आले. मा. मुख्यमंत्री व सेवानिवृत्त अतिरिक्त साबां. सचिव  श्री.आनंद कुलकर्णी यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाऊलं उचलून एक वेगळा पायंडा पाडण्याचे दृष्टीने मोठ्या कामाचे व एकाच कामाचे तुकडे (स्पिलटप) करू नये  असा आदेश काढला होता. परंतु फुलब्री उपविभागात सर्वेच्या कामाचे तुकडे पाडण्यात आले. औरंगाबाद मंडळ अंतर्गत तात्कालिन कार्यकारी अभियंता श्री.पी.के.  पाटील यांनी कामाचे (स्पिलटप) केल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने राज्य शासनाला श्री.पी.के पाटील यांचेवर  कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य शासनाने (माजी मंत्री इडीग्रस्त) भुजबळांनी भ्रष्टाचाराला साथ दिल्याने श्री.पी.के. पाटील यांचेवर आज तगायत  कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे सरकारची नामुष्की नाही तर काय सा.बां. सचिवांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
एमआयटीची नाशिक येथील 23 एकर जागा
भुजबळांच्या एमआयटीला 23 एकर जमीन हस्तांतरीत कोणी केली. ती शासनाने जप्त केली आहे. मात्र, त्या वेळसचे अधिक्षक अभियंता व सध्याचे  मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि किशोर पाटील यांनी कुठले निकष लावुन ही जागा दिली होती हा सर्वांना पडलेला प्रश्‍न आहे. हीच फाईल मंत्रालयातुन  गहाळ कशी झाली व कोणी केली. उद्याच्या अंकात कव्हर स्टोरी