कराड अर्बन बँकेचे पर्यावरण जागृतीचे कार्य मोलाचे : औंधकर
कराड, दि. 06 - कराड अर्बन बँकेचे अर्थकारणाबरोबर पर्यावरण जनजागृतीचे कार्य मोलाचे असून त्यानिमित्ताने बँकेने जोपासलेली सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली आहे, असे उद्गार कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी काढले.
बँकेने दि. 24 जानेवारी 2016 रोजी शताब्दी वर्षात पदार्पण केली. शताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सायकल रॅलीद्वारे झाला. यावेळी आयोजित समारंभात औधकर बोलत होते. रविवारी (आज) 5 जून रोजी सकाळी 8.30 वाजता कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयापासून सुरूवात झाली. रॅलीच्या सुरूवातीला कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. ए. दिलीप गुरव तसेच कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, आर. टी. ओ. स्टीवन अल्वारिस यांनी हिरवा झेंडा दाखविला.
औंधकर म्हणाले, शासनाने झाडे लावण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक झाडाबाबत दर तीन महीन्यांनी आढावा घेतला जाणार आहे. कराड अर्बन बँकेने वृक्षारोपण व पर्यावरण कार्यामध्ये सक्रीय सहभाग घेतल्याने कराड स्मार्ट सिटी होण्यास वेळ लागणार नाही.
याप्रसंगी बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, बँकेचे संचालक अॅड. संभाजीराव मोहिते, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. ए. दिलीप गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सायकल रॅलीला कराडकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध चौकात तसेच रस्त्याच्या दुतर्फा थांबून नागरिकांनी फुलांच्या पाकळ्या टाकून सायकल रॅलीचे स्वागत केले. या रॅलीमध्ये सायकलवरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक लावण्यात आले होते.
यावेळी संदीप कोटणीस, राकेश पोरवाल, चंद्रकांत जाधव, एनव्हायरो फ्रेंडस् नेचर क्लब कराडचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद, दिनेश पोरवाल, सुधीर सुकरे, नितीन तांबवेकर, मंगेश हिरवे, दिपक बेलवणकर, क्षितीज बेलापूरे यांच्यासह सेवक, ग्राहक, खातेदार, सायकलप्रेमी, पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमींचे विविध ग्रुपचे सायकलस्वार सहभागी झाले होते. रॅलीमध्ये हर्षवर्धन घोडके हा पाच वर्षाचा मुलगा सहभागी झाला होता.
ही रॅली बँकेच्या मुख्य कार्यालयापासून सुरू होवून कराड शहरातील मुख्य पेठेतून कृष्णाबाई घाट, चावडी चौक, बँकेची गुरूवार पेठ शाखा ते मंगळवार पेठेतून कृष्णा नाका, कॉटेज हॉस्पिटल, दत्तचौक ते बँकेचे मुख्य कार्यालय या मार्गावरून काढण्यात आली. सायकल रॅलीचा समारोप बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये झाला. सांगता समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप चिंचकर यांनी केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. ए. दिलीप गुरव यांनी आभार मानले.