Breaking News

माणुस हा निसर्गाचा मोठा शत्रू : जिल्हाधिकारी कवडे

। मिरजगांव ग्रामपंचायतनी आणलेल्या जे. सी. बी. चा लोकार्पण सोहळा संपन्न

 मिरजगाव। प्रतिनिधी । 07 -  माणुस हा निसर्गाचा मोठा शत्रू आहे असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी अनिल कवडे यानी केले.मिरजगांव ग्रामपंचायतीने नविन आणलेल्या जे. सी. बी. लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होतेे.

 मिरजगांव ग्रामपंचायतीने विविध विकास कामाचा पाया घातला
असुन विकास कामे जोमाने करण्यासाठी 26 लाख रूपये खर्च करून जे. सी. बी. आणला हे कौतुकास्पद आहे. जिल्हयातील जे.सी.बी. खरेदी करणारी मिरजगांव ग्रामपंचायत असुन या मशिनमुळे मिरजगांवच्या विकास कांमाचा आलेख उंचवला जाणार आहे. असे ते म्हणाले.जे.सी.बी.चा लोकार्पण जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र बिनावडे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पुजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते तर या कार्यक्रमास मिरजगांवचे सरपंच नितिन खेतमाळस,उपसरपंच अमृत लिंगडे, कर्जत पं.स. सदस्य डॉ.पं-सजयरीनाथ गोरे, प्रांतधिकारी रविद्र ठाकरे, मा. सरपंच सारंग घोडेस्वार, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, पणनचे प्रसाद -सजयोकरीकर,तालुका राष्ट्रवादीचे नेते राजेद्र गुंड, राशिनचे विक्रम देशमुख, कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेवरे,संपतराव बावडकर, तालुका कृषीधिकारी राजेद्र सुपेकर,मिरजगांव कृषीअधिकारी मुरकुटे साहेब, गुलाब तनपुरे, डॉ.चद्रकांत कोरडे,उषादेवी चेडे.सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी कवडेपुढे म्हणाले म्हणाले जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्त साधतमिरजगांव ग्रामपंचायतने आणलेल्या जे.सी. बी. बद्दल ग्रामपंचायतचे अभिनंदन केले. एवढा मोठा धाडशी निर्णय घेवुन विकास कामात पुढचे पाऊल टाकले आहे.मशिनमुळे गावचा विकास -झपाटयाने होण्यास मदत होईल तसेच जलयुक्त शिवार येाजनेच्या कामासाठी मोठा फायदा होईल. या भागातचार हजार हेक्टर क्षेत्रावर कंपारमेंटचे कामे करायची आहेत.त्यामुळे मिरजगांव परीसराला पाण्याचा सुकाळ नक्कीच जानवेल. परंतु मणुष्याला पाण्याविषयी पाहीजे ते गांभिर्य राहीले नाही त्यामुळेच असे भिषण दुष्काळ पडत आहे. यावेळी उदाहरण देत म्हणाले पुर्वी मोटेने पाणी शेतीला दिले जात त्यामुळे शेती नेहमी हिरवी दिसायची परंतु इलेक्ट्रीक पंप आल्यापासून शेतकर्‍यांनी भुजलाचा विचार न करता पाणी उपसा सुरू केला. पाण्याचा अंदाज न घेता उत्पादने काढण्याच्या नादात शेती तोटयावर केली. त्यामुळे आपली शेती सुजलाम सुफलाम होवु शकली नाही. परिस्थिती नुसार पिके घेण्याचा सल्ला दिला. यावेळी पाचपुते यांचे भाषण झाले.