शाळेचे पत्रे उडाले, वीजखांब जमीनदोस्त
पारनेर । प्रतिनिधी । 07 - ढवळपुरी (ता.पारनेर) येथील आदिवासी व दुर्गम भागातील सुतारवाडी, लालुचा तांडा परिसर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळामुळे अजूनही सावरलेला नाहीे. या भागात मोठया प्रमाणावर वित्त हानी झालेली आहे. वीज खांब पडल्याने हा भाग अजूनही अंधारात आहे. ढवळपुरी जि.प. गटाचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुजित झावरे यांनी शनिवारी या भागाची पाहणी करुन आपदग्रस्तांना दिलासा दिला.
वादळामुळे लमानतांडा प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेले तर शेजारील शालेय पोषण आहाराची खोलीही उद्ध्वस्त झाली. तसेच अपंग कुंडलिक पवार यांच्या इंदिरा आवास योजनेतील घरकुलाचे पत्रे उडाले हे कुटुंब बेघर झाले आहे. कलाबाई बर्डे व रंजना बर्डे यांच्या नवीन घरकुलांच्या भिंती वादळामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. नारायण पवार यांची खिलार जातीची गाय दगावली.
वादळामुळे सुतारवाडी, लमाणतांडा, कोंडीबाची ठाकरवाडी, पठारवाडी, कुटे आखाडा, संभाची वाडी, आळयाची ठाकरवाडी आदी भागातील वीज खांब पडल्याने हा परिसर सध्या अंधारात
आहे. सुजित झावरे यांनी ’महावितरण’च्या अधिकार्यांना तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. महसुल विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसिलदारांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.