Breaking News

इयत्ता 10 वीचा जिल्ह्याचा निकाल 93 टक्के

। 22 हजार मेरिटमध्ये 28 हजार प्रथमवर्गात; 17 हजार द्वितीय वर्गात उत्तीर्ण । मुलींनी बाजी मारली 

अहमदनगर । प्रतिनिधी । 07 - इयत्ता 10 वी चा नगर जिल्ह्याचा निकाल 92.83 टक्के लागला. जिल्ह्यातून 71 हजार 255 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातील 66 हजार 146 उत्तीर्ण झाले त्यात 21 हजार 958 मेरिटमध्ये, 27 हजार 504 प्रथमवर्गात, 16 हजार 5
67 द्वितीय वर्गात तर 2 हजार 117 तृतीय वर्गात उत्तीर्ण झाले आहेत. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास निकाल जाहिर करण्यात आला. निकाल बघण्यासाठी सायबरकॅफे मध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. तसेच मोबाईलवरही अनेकांनी घरीच निकाल पाहणे पसंत केले. वेगवेगळ्या तारखा व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जाहिर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता.माध्यमिकच्या परिक्षा बोर्डाने सोमवारी निकाल जाहिर होणार असे वेगवेगळ्या प्रसार माध्यमाद्वारे अधिकृत जाहिर केले. त्यानुसार सोमवारी निकाल जाहिर करण्यात आला.
जिल्ह्यातून 40 हजार 483 मुले परिक्षेस बसली होती. त्यातील 37 हजार 139 उत्तीर्ण झाली. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.74 टक्के आहे. तसेच जिल्ह्यातून 30 हजार 772 मुलींपैकी 29 हजार 7 उत्तीर्ण झाल्या. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.26 आहे. 12 वी प्रमाणेच 10 वी च्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. संपुर्ण पुणे विभागाचा निकाल 93.30 टक्के लागला. माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, तपशील वार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख आणि कला चाचणीचा कल अहवाल यांचे वाटप विभागीय मंडळामार्फत 15 जुन रोजी सकाळी 11 वा. करण्यात येईल त्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका यांचे वाटप माध्यमिक शाळांमार्फत करण्यात येईल. असे राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.