Breaking News

गोव्यात ‘सेक्स टुरिझम’ मध्ये वाढ : केजरीवाल

पणजी, दि. 29 -  ‘गोव्यामध्ये ‘सेक्स टुरिझम‘चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे,‘ असा आरोप ‘आम आदमी पार्टी‘चे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केला. ‘राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर गोव्यात सुरू असलेला अंमली पदार्थांचा व्यवसाय आणि वेश्याव्यवसाय यामुळे राज्याची बदनामी होत आहे,‘ असेही केजरीवाल म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल सध्या गोव्याच्या दौर्‍यावर आहेत. प्रचारासाठी केजरीवाल यांनी येथील हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधितांची आज भेट घेतली.