आरोग्यदायी जीवनासाठी योग महत्वाचा : खा. उदयनराजे
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : सुखी, समाधानी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योग महत्वाचा आहे. योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात यशस्वी करा, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयाचा आयुष विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अंबिका योग कुटीर-ठाणे शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठक झाली. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले अध्यक्ष म्हणून बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, महिला बालकल्याण सभापती वैशाली फडतरे, समाज कल्याण सभापती सुरेखा शेवाळे, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, इशा फाऊंडेशनच्या मॉ कश्यपी, बसवराज देशमुख तसेच विशेष समित्याचे सभापती आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला धन्वंतरी मुर्तीचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. 21 जून आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मोठी चळवळ उभी करुन योगाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करा, असे सांगून करुन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षणबरोबर योगही महत्वाचा आहे. आपले जीवन सुखी, समाधानी व आरोग्यदायी जगण्यासाठी दिनचर्यात योग आणला पाहिजे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात ताण ताणावामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य बिघडते. सुखी, समाधानी आणि निरोगी आरोग्य जीवन जगण्यासाठी योग महत्वाचा आहे. योगामुळे आत्मिक समाधान, आत्म विश्वास वाढून त्याचा सकारात्मक परिणाम कामातून दिसून येतो. त्यामुळे समाज सुखी राहतो त्यासाठीच योग महत्वाचा आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर म्हणाले, आपल्या देशाला मोठी योग परंपरा आहे. योग साधना अंगीकरण करणे, त्याचा प्रचार करणे महत्वाचे आहे. आरोग्यदायी जीवन प्राप्त करुन देणारी योग साधना आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदमार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, हजारो वर्षापासून योगाचे आपल्या देशात परंपरा आहे. 178 देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाला समंती दिली आहे. योग केवळ वैयक्तिक नव्हे तर सामुदायिकस्तरावर चांगली प्रक्रिया आहे. योगामुळे संयम, समाधान कृती संतुलीत करता येते. चांगले समाज व्यवस्था घडविण्यासाठी आणि योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी येत्या 21 जून रोजी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख, बसवराज देशमुख, मॉ कश्यपी यांनीही मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात योग या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष विजय बडेकर, नगरसेवक डी. जी. बनकर यांनी मनोगत व्यक्त केले.