Breaking News

2कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवा ः जिल्हाधिकारी

बुलडाणा (जिमाका) दि. 18 -  ः राज्यात 1 जुलै या एकाच दिवशी दोन कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही 1.50 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यंत्रणानिहाय उद्दिष्टाची विभागणीही करण्यात आली आहे. यंत्रणांनी आपल्याकडील उद्दिष्टाप्रमाणे खड्डे खोदून, वृक्षारोपणाचे स्थळ कळवायचे आहे. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभावीपणे यंत्रणांनी राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अप्पर पोलीस अधिक्षक श्‍वेता खेडेकर, सामाजिक वनीकरचे उपसंचालक सुरेश मोरे, वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. भगत, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींसह विविध यंत्रणांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
   वृक्षलागवडीचे उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्याला मिळालेल्या उद्दिष्टाचा केवळ विचार न करता जास्त वृक्ष लागवड होत असेल, तर जरूर करावी. या कार्यक्रमात एनजीओ, व्यापारी व्यवस्थापन, उद्योग यांचाही समावेश करावा. त्यांनाही वृक्ष लागवडीसाठी रोपे द्यावीत. प्रत्येक यंत्रणेने खड्डे खोदून अक्षांश- रेखांशासह माहिती द्यायची आहे. ती पूर्ण करावी. याप्रसंगी वन विभाग व सामाजिक वनीकरच्यावतीने माहिती देण्यात आली. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे कर्मचारी उपस्थित होते.