वातावरणातील बदलाचा आर्क्टिकावर परिणाम
केम्ब्रिज, दि. 06 - पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरून धोक्याचा इशारा देणारी माहिती जागतिक पर्यावरण दिवस जगभरात साजरा होत असताना समोर आली असून जे मागील 1 लाख वर्षाच्या दरम्यान झाले नाही ते आता आर्क्टिकवर होऊ शकते. येत्या दोन वर्षामध्ये आर्क्टिकवरील समुद्रात असणारा बहुतांश बर्फ वितळणार असल्याचा दावा प्रसिद्ध संशोधकाने केला आहे. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या आसपास असणा-या भागाला आर्क्टिक म्हटले जाते.
ही माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय स्नो ऍन्ड आईस डाटा सेंटरने उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून समोर आली असून त्यानुसार या वर्षाच्या 1 जूनपर्यंत आर्क्टिक समुद्रामध्ये फक्त 11.1 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरातच बर्फ शिल्लक राहिलेला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 1.5 दशलक्ष चौरस मीटरचा परिसर पूर्ण यूनायटेड किंगडमला 6 वेळा जोडण्याएवढा आहे. या मोठया भागातून मागील 30 वर्षाच्या दरम्यान बर्फ गायब झाला असून मोठया प्रमाणात येणारी वादळे आणि बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असल्याचे संशोधकांनी माहिती देताना सांगितले.
चार वर्षापूर्वीच बर्फ नष्ट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याला आता दुजोरा मिळाला आहे. या परिसरातून बर्फ गायब होण्याचा माझा अंदाज असून, या वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत येथील 10 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरातील बर्फ मोठया प्रमाणावर वितळणार आहे, असे केम्ब्रिज विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक पीटर वडहम्स यांनी हा दावा केला आहे. बर्फ वितळण्यामुळे समुद्रातील पाण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.