वाडी परिसरातील सिमेंट बंधार्यात साचले पाणी
परभणी, दि. 30 - जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले असून नुकत्याच झालेल्या पावसाने जिंतुर तालुक्यातील वाडी परिसरातील ओढे-नाल्यांत पाणी साठले. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या विविध जलसंधारणाच्या कामांची परिणामकारता आता दिसून येऊ लागली आहे.सिमेंट बंधा-याच्या खोलीकरणाची कामे प्रभावीपणे झाल्यामुळे परिसरातील बांधात पाणी साठल्याचे आढळून येत आहे. जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे झाली आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जिंतुर ता
लुक्यातील वाडी येथे सिंमेट बंधारे उभारले आहेत. खोलीकरणाची कामेही झाली आहेत. वाडी येथील सिमेंट बंधा-यात नुकत्याच झालेल्या पावसानंतर पाणी साठले आहे. बांधात साठलेल्या पाण्यामुळे शिवारातील विहिरींच्या तसेच बोअरच्या पाणीपातळीत साधरणतः तीन फूटापर्यंत वाढ झाल्याचे आढळून येत असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता गजानन वैरागड यांनी सांगितले. खोलीकरण केलेले बंधारे भरुन वाहु लागल्याने तसेच साचलेले आणि वाहणारे पाणी पाहुन परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत.