Breaking News

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर

मुंबई, दि. 30 -  अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरूवारी भेट घेत ‘वृक्षारोपण’ कार्यक्रमाचे त्यांना आमंत्रण दिले. भाजपच्या वतीने राज्यात दोन कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुनगंटीवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले. या वेळी मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरे यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, आमची ही आजची भेट राजकीय नाही. पर्यावरण संरक्षणाच्या निमित्ताने आपण भेटत आहोत. जंगलात वाघांच्या संख्येत वाढ कशी होईल, यावरही चर्चा करण्यात येणार आहे.