महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात
चिखली (प्रतिनिधी) दि. 08 - स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात हिंदु सुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंति निमित्त अभिवादन करण्यता आले. यावेळी भाजपा चिखली विधानसभा संपर्क मंत्री सुरेशअप्पा खबूतरे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावैही भाजपा राज्य परिषद सदस्य साहेबराव पाटील, दुष्काळ निवारण समिती सदस्य शिवाजीराव करे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस चक्रधर लांडे, दिदा पाटील, प्रल्हाद भालेकर, संतोषराव गाडेकर, अकबरसेठ आतार, अर्जुनराव पाटील, पत्रकार रविंद्र फोलाने, तोताराम भुसारी, विजय खरे आदिंची उपस्थिती होती.
