Breaking News

थकित पगार आणि वस्तीगृहाचे रेकॉर्ड मिळण्यासाठी अधिक्षकाचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण

बुलडाणा, दि. 08 - गेल्या 4 महिन्यांपासून पगार न दिल्यामुळे आणि वसतीगृहाचे रेकॉर्ड अधिक्षकांजवळ न ठेवता संस्था अध्यक्ष यांनी घरी नेल्यामुळे संजय रामचंद्र जाधव अधिक्षक वसंतराव नाईक मुलांचे वसतीगृह जानेफळ ता.मेहकर यांनी 6 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयापूढे बेमुदत उपोषण सुरु केले असून न्यायाची मागणी केली आहे.
      जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, 1 जुर्ल 2003 पासून जानेफळ ता. मेहकर जि.बुलडाणा येथील वसंतराव नाईक मुलांचे वसतीगृहामध्ये अधिक्षक या पदावर कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष जानकीराम मेश्राम चव्हाण हे खोटेनाटे कारणे सांगून मला बदनाम करीत आहे. माझ्यावर आरोपपत्र सुध्दा दाखल केले व आरोपपत्राचे अधिकारी म्हणून त्यांचेच भाऊ जो की बाबुसिंग मेराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. मी वसतीगृहामध्ये हजर असतांना ही मला गैरहजर दाखवून आरोप एकतर्फी लावून मला बडतर्फ करण्यात आले. मी समाजकल्याण अधिकार्‍यांकडे गेलो असता मला अधिकार्‍यांनी जसे कामावर होतो तसेच कामावर रुजू करण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर मी रुजू झाल्यावर संस्थेचे अध्यक्ष यांनी मला कमी करण्याचे उद्देशाने वसतीगृहाचे रेकॉर्ड, कर्मचारी रजिष्टर सोडून पूर्ण रेकॉर्ड त्यांच्या हस्ताक्षरात आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी व तसेच महिन्यांनी विद्यार्थी हजेरी भरुन काढतो. आणि मी वसतीगृहामध्ये नियमित हजर असतांना मला गैरहजर दाखविले. 4 मार्च 2014 ला वसतीगृहाला थममशिन मिळून सुध्दा आतापर्यंत मी वसतीगृहामध्ये चालू करण्यात आली नाही. कारण मशीन चालू केली असता संस्थेला खोटे नाटे आरोप करता येणार नाही. या उद्देशाने आतापर्यंत ती मशीन चालू केली नाही.
संस्थेला ग्रँड दिला जातो आणि 24 तास राबणार्‍या अधिक्षकाला वेतन दिले जात नाही. यामुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. माझा चार महिन्यांचा पगार देण्यात यावा अशी मागणी संजय रामचंद्र जाधव यांनी केली आहे.