अखेर बिनविरोध झाली विधान परिषद निवडणूक
मुंबई, दि. 3 - भाजपचे अधिकृत उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलेले भाजप नेते मनोज कोटक यांनी आज अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे 10 जागांसाठी आता दहाच उमेदवार रिंगणात असल्याने पुढल्या शुक्रवारी निवडणूक होणार नाही. ही निवडणूक बिनविरोध झाली. आता नारायण राणे यांची तोफ विधानपरिषद धडधडेल हे स्पष्ट झाली आहे.
शिवसेनेचे दोन मंत्री या बिनविरोध निवडीने विधान परिषदेचे सदस्य होणार आहेत त
र एकीकडे भाजपने मित्रपक्षांना खूश करताना बाहेरून आलेले मुंबईतील दोन नेते विधानभवनात पाठवून महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी तयार केली. तर काँग्रेसचे नारायण राणे यांचे या निमित्ताने राजकीय पुनर्वसन झाले आहे. निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता ती शक्यताही मावळली आहे.
सुरजितसिंग ठाकूर, प्रविण दरेकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, आर एन सिंग हे भाजपकडून तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे आणि काँग्रेसकडून नारायण राणे, शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते हे उमेदवार विजयी झाले आहेत. आता केवळ विजयाची अनौपचारीक घोषणा बाकी आहे.