Breaking News

महाराष्ट्र स्कॉलर्स स्कॉलरशिप एक्झामिनेशन मध्ये समीक्षा बागडे राज्यात प्रथम

अहमदनगर, दि. 29 - पुढील काळ हा संगणकाचा असल्याने त्यासाठी त्याचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रात संगणकीय स्पर्धा परीक्षा हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाडचे आमदार भरत गोगावले यांनी महाड, रायगड येथे केले.
महाराष्ट्र  स्कॉलर्स स्कॉलरशिप एक्झामिनेशन हि महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन परीक्षा गेल्या वर्षी घेण्यात आली होती . या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले, त्यांच्या स्कॉलरशिप वितरण करण्याच्या कार्यक्रमात आ.गोगावले हे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र  स्कॉलर्स स्कॉलरशिप एक्झामिनेशनचे अध्यक्ष श्री.प्रवीण धोत्रे यांच्यासह, प्रशासन अधिकारी  श्री.मयुर कांबळे, वित्त अधिकारी श्री. विश्‍वराज मोरे, रायगड जिल्हा समन्वयक अधिकारी निखिल बुटाला, अ.नगर जिल्हा समन्वयक अधिकारी श्री.श्रीकांत तवले, पुणे जिल्हा समन्वयक अधिकारी श्री.संतोष कुडले,नाशिक जिल्हा समन्वयक अधिकारी श्री.राकेश देशमुख,सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक अधिकारी श्री.सावंत, पालघर जिल्हा समन्वयक अधिकारी गौतम घोलप आदि उपस्थित होते.
या परीक्षेमध्ये 700 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. 10वी मधील समीक्षा बागडे, प्रशांत पवार(9वी), दीप गांधी(8वी), चिन्मय शेठ(7वी), ऋग्वेद कोकणे(6वी), गायत्री लोकरे(5वी), वामन गाडगीळ(4थी) हे सर्व राज्यात प्रथम आले. या सर्व प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 21 हजार रुपये स्कॉलरशिप सलग तीन वर्षे देण्यात आली.तसेच त्यांच्यासोबत उतीर्ण झालेल्या 28 विद्यार्थ्यांना मेरीटप्रमाणे 15 हजार,11 हजार,7 हजार,5 हजार रुपये अशी स्कॉलरशिप देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 700 विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात अध्यक्ष प्रवीण धोत्रे यांनी एम्एसएसई हि शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन परीक्षा असून हि परीक्षा घेण्यामागे कोणताही आर्थिक निकष नसून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षेचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे सांगितले. अनाथ,आदिवासी, व अपंग  विद्यार्थ्यांना विनाशुल्क या परीक्षेमध्ये सहभागी होता येईल, असे हि सांगितले. गुरुकुल ज्ञान प्रसारक मंडळ अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना विनाशुल्क संगणक प्रशिक्षण, बेरोजगार सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिर आदि उपक्रमराबविल्याचे हि सांगितले.