‘बेटी बचाव’ अभियानासाठी सरसावल्या महिला बायकर्सचे
नवी दिल्ली, दि. 08 - महिला बायकर्सचा एक गट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी 10 देशांच्या दौ-यावर रवाना झाला आहे. गुजरातमधील सुरतमध्ये राहणा-या या महिला आपल्या दौ-याच्या पहिल्या टप्प्यात नेपाळला पोहोचल्या असून नेपाळमधील भारताचे राजदूत रणजीत रे यांनी त्यांचे स्वागत केले. काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या अभियानाची माहिती दिली. जगभर पंतप्रधानांच्या या मोहीमेला पोहोचविण्याची ही आमच्यासाठी पहिलीच संधी आहे, असे महिला बायकर्सच्या प्रमुख डॉ.सारिका यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या या मोहीमेला यश मिळावे आणि महिलांविषयी असेलेला सन्मान वाढावा यासाठी हा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या दीड महिन्याच्या प्रवासादरम्यान गुजरातमधील सूरतच्या राहणा-या चार युवती नेपाळमध्ये दाखल झाल्या आहेत. 11 जुलैपर्यंत चालणा-या या अभियानाचा समारोप पुढील महिन्यात 12 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या चार महिला बायकर्स सदस्यांची भेट होणार आहे. यावेळी त्या आपले विविध देशातील अभियानादरम्यान आलेल्या अनुभवाचे कथन करणार आहेत. या महिला बायकर्सपैकी एक सदस्य धूर्वा यांनी सांगितले की, त्या चौघी नेपाळहून भूतानला जातीत, तसेच म्यानमार, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम आणि या अभियानाच्या शेवटी सिंगापूरला पोहचणार आहेत. बेटी बचाव, बेटी पढाओ अभियानाचा प्रचार व प्रसार जगभर करणा-या या महिला बायकर्सची देशभरात चर्चा सुरू आहे. त्यांच्या या अभियानाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.