केरळात मान्सूनचे आगमन
मुंबई, दि. 08 - राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी मान्सून राज्यात लवकर दाखल होण्याची सर्वांना प्रतिक्षा आहे. आता मान्सूनच्या आगमनाची वेळ जवळ आली असून केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. याची अधिकृत माहिती हवामान विभागाने दिल्यामुळे राज्यात येत्या 1-2 दिवसात पावसाची शक्यता आहे.
सलग 24 तासात अडीच मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास तेथे मान्सून दाखल झाला असे जाहीर केले जाते. परावर्तित होणारे दीर्घ सूर्यकिरण आणि मोसमी वार्यांचा प्रवाह यांचा अभ्यास केल्यानंतर मान्सून जाहीर केला जातो. दरवर्षी मान्सून श्रीलंकेमार्गे 1 जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. यंदा मात्र दोन आठवड्यांपूर्वी निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात विघ्न आल्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभाग आयएमडीने यंदा मान्सून 7 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवली होती.
आता केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असते. केरळनंतर मान्सून कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो. त्यामुळे येत्या 2 दिवसात राज्यात मान्सून दाखल होण्याची बळीराजासह सगळेच आतूरतेने वाट पाहत आहेत.