ब्रेक्झिट’ कदाचित घडणारच नाही : केरी
वॉशिंग्टन, दि. 29 - युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनने घेतलेल्या निर्णयाची कदाचित कधीच अंमलबजावणी होणार नाही, असे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रीजॉन केरी यांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर, इयुमधून बाहेर पडण्याची ब्रिटनला कसलीही घाई दिसत नसल्याचे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदविले.ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्याशी केरी यांची नुकतीच चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केलेले हे मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ब्रेक्झिट हा अत्यंत गुंतागुंतीचा घटस्फोट असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.