श्रीलंकेत लष्करी गोदामात स्फोट
कोलंबो, दि. 0 6 - कोलंबो जवळ असलेल्या सलावा लष्करी गोदामात झालेल्या एकामागोमागच्या स्फोटामुळे भयानक आग लागली असून ही आग विझविण्यात अद्यापी यश आलेले नाही. रात्री उशीरा या आगीचे लोळ दुरवरूनही दिसत होते त्याचबरोबर रस्त्यावर अनेक नागरिक घराबाहेर पडून सैरावैरा धावताना दिसत होते. हे स्फोट इतके जोरात झाले की या भागात मोठे हादरे बसले तसेच आसपासच्या 3 किमीच्या परिसरात इमारतींचा मलबा फेकला गेल्याचेही समजते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आगीचे कारण समजू शकलेले नाही.
या स्फोटात नक्की किती नुकसान झाले त्याचा अद्यापी अंदाज आलेला नाही. मात्र 1 सैनिक ठार व सात सैनिक जखमी झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली गेली आहे.धुरात गुदमरलेल्या 40 नागरिकांवर उपचार केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था मंत्री सागला रत्नायके यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डेपोमध्ये ही आग पसरली असून हजारो नागरिक घरे सोडून पळाले आहेत. या डेपोमध्ये दारूगोळा तसेच हत्यारे शस्त्रे मोठ्या प्रमाणावर साठविली गेली होती.