ब्रिटनच्या खासदाराची गोळ्या घालून हत्या
लंडन, दि. 17 - ब्रिटनच्या एका महिला खासदाराची तीन गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही दुर्देवी घटना गुरूवारी दुपारी साडेबारावाजता घडली आहे.
जो कॉक्स (वय 41) असे मृत्यू झालेल्या महिला खासदाराचे नाव असून, त्या लेबर पार्टीच्या होत्या. कॉक्स या वेस्टर्न ब्रिस्टलच्या मार्केट स्ट्रीटवर जात होत्या. त्यावेळी तेथील एका ग्रंथालयाजवळ दोघांमध्ये भांडण सुरू होते. कॉक्स या दोघांचे भांडण सोडवायला गेल्या. मध्यस्थी करताच त्यांच्यावर गोळ्या घालून चाकून सपासप वार करण्यात आले. त्यामुळे त्या जागेवरच कोसळून रस्त्याच्या कडेलाच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.