स्वसंरक्षणार्थ हल्ला गुन्हा नव्हे ! सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली, दि. 17 - सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तीच्या स्वसंरक्षणार्थ केलेला हल्ला हा आता गुन्हा ठरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे असा हल्ला करणाऱया व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवता येणार नाही.राजस्थानमधील एका घटनेच्या सुनावनीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे. या घटनेमध्ये दोघांनी आपल्या कुटुबीयांवर हल्ला होताना पाहून कायदा हाती घेतला होता. यात दोघे जखमी झाले, तर संबंधितांचे वडील गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. प्रत्येक व्यक्तीला स्वसंरक्षणार्थ (सेल्फ डिफेन्स) हल्ला करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी व्यक्तीने कायदा हातात घेतल्यास त्याच्यावर यापुढे गुन्हा नोंदवता येणार नाही.
