बुर्हाण बादशाह काळातील बारवे मधील गाळ काढल्याच पाणीप्रश्न सुटेल
अहमदनगर, दि. 04 - सर्वत्रच दुष्काळाची भिषण परिस्थिती आहे. मात्र आपण राबविलेल्या घोसपुरी, बुर्हाणनगर पाणी योजनेमुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न नगर तालुक्यातील बहुतांश गावात जाणवत नाही. मात्र जनावरांचा चारा व पाणी प्रश्नामुळे छावण्यांना मंजुरी मिळाली यामध्ये हजारो जनावरे दाखल झाली शेतकर्यांना मोठा आधार मिळाला. भविष्यात पाणी कसे राहील यासाठी बुर्हाणनगर येथील बुर्हाण बादशाह काळातील बारवे मधील गाळ काढून पूर्ण स्वच्छ केल्याने पाणी वापराचा प्रश्न सुटेल असे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
बुर्हाणनगर येथे पुरातन काळातील बुर्हाण बादशाहाच्या काळातील बारवे मधील गाळ काढण्याचा शुभारंभ आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच आण्णा कचरे, पै.संदिप कर्डीले, ग्रा.पं.सद्स्य आकाश थोरात, दिनेश वाडेकर, अंजुम पठाण, किशोर कर्डीले, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.
आ.कर्डिले पुढे म्हणाले, 10 ते 15 वर्षापूर्वी या बारवेची साफ-सफाई केली होती. त्यावेळी त्यामध्ये पुरातन काळातील काही वस्तु, नंतर देवीच्या विर्सजनाचे वस्तू निघाल्या होत्या. 9 परस खोल असलेल्या या बारवेत आजही पाणी आहे. पण गणपती विर्सजणामुळे कचरा टाकण्याने हि बारव अस्वच्छ झाली. त्यातील गाळ काढून पुन्हा स्वच्छ करण्याचा शुभारंभ आज होत आहे. 15 दिवसात पावसाळ्यापूर्वी के्रनच्या सहाय्याने हि बारव साफ सफाई करुन पुन्हा पाणी येईल त्या पाण्याचा वापर जनावरांना पिण्यासाठी तर ग्रामस्थांना सांडपाणी म्हणून होईल असे ते म्हणाले.
पै संदीप कर्डीले या ंनी आपल्या भाषणात सांगितले हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी योजनेतून होत असले तरी गावातील युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ श्रमदान करुन हि मोहिम यशस्वी करु. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हि बारव स्वच्छ दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरपंच आण्णा कचरे, ग्रा.पं. सदस्य श्रीधर पानसरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले या बारवेमुळे बुर्हाणनगरकरांचा 50 टक्के पाणी प्रश्न सुटेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.