पहिल्या दिवशी 242 पुस्तके देऊन पोलीस अधीक्षकांचे स्वागत
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : ’बुके नको बुक द्या’ या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आवाहनाला सातारकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी 242 पुस्तके देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
गडचिरोलीहून सातारा येथे बदली झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पाटील यांनी माझ्या स्वागताला बुके आणण्यापेक्षा लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तके किंवा इतर प्रेरणादायी मार्गदर्शक पुस्तके भेट म्हणून द्यावीत, बुके नको बुक द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील, अति दुर्गम भागात 33 ठिकाणी वाचनालये उभारण्यात आली आहेत. या वाचनालयांच्या माध्यमातून गरजु आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.
आपल्या स्वागतासाठी जमा होणारी पुस्तके या 33 ठिकाणच्या वाचनालयांमध्ये पाठविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी आवाहन केले होते. पाटील यांनी काल सायंकाळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. आज सकाळपासून पत्रकार, अधिकारी, विविध पदाधिकारी, अभ्यागत यांच्याकडून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पुस्तके देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. आजच्या पहिल्याच दिवशी सातारकरांनी 242 पुस्तके देवून त्यांचे स्वागत केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेल्या माहितीपूर्ण पुस्तकांचा समावेश असल्याने सातारा जिल्ह्यातील संस्कृती, शैक्षणिक तसेच विकासात्मक माहिती आता गडचिरोली जिल्ह्यात पोहोचणार आहे.