नगर रेल्वे स्थानकास पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्या ः शेंडगे
अहमदनगर, दि. 01 - पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 291 वी जयंती समारंभ उत्कर्ष फौंडेशन, अहदनगरने अभिनव पद्धतीने साजरा केला. अहिल्यादेवींच्या प्रतिमेची शोभायात्रा भिस्तबाग चौकातून डॉ.सुधाताई कांकरिया, सुरेशजी चव्हाण, डॉ.अशोक भोजने, प्रा.बाळासाहेब शेंडगे यांनी प्रतिमा पूजन करुन शुभारंभ केला. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते ‘धनगरी गजी ढोल नृत्य’ या पारपांरिक नृत्याने शोभायात्रा कोहिनूर मंगल कार्यालयापर्यंत पोहचली. नगरकरांनी या आदिवसी धनगरी नृत्याचा प्रथमच मनमोहक व नादमोहित अविष्कार अनुभवला. यावेळी शेंडगे यांनी अहिल्यादेवींचे नांव नगर येथील रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली.
कोहिनूर कार्यालयामध्ये समारंभाची सुरुवात अहिल्यादेवींचे प्रतिमापूजन व दीप्रज्वलन माजी आ.दादाभाऊ कळमकर, आ.संग्राम जगताप, प्राचार्य डॉ.मतकर, कलावती शेळके, सौ.शारदाताई ढवण, सुवेंद्र गांधी, इंजि.डी.आर.शेंडगे, बाबासाहेब देशमुख यांनी केले.
महापौर अभिषेक कळमकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची महती सांगताना राघोबा दादास देवींच्या खलित्याने गर्भगळीत केल्याचे सांगितले. उत्कर्ष फौंडेशनचा नियोजित कार्यासाठी महापालिका सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन केले.
न्यू आर्टस् महाविद्यालय, शेवगांवचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण मतकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार तरुणांमध्ये रुजविण्यासाठी पुणे विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यासन सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आ.संग्रामभैय्या जगताप यांनी धनगर समाजाच्या सर्व समस्यांवर ठोस उपाय योजनांचा पाठपुरावा करण्यास कटीबद्ध असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींचे कार्य व विचार हे सध्याच्या राजकारणी, समाजकारणी, नेत्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे व त्यानुसार त्यांनी मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. जयंती महोत्साचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब शेंडगे व श्री.मंचरे यांनी केले. जयंती उत्सवानंतर प्रसादरुपी भोजनाचा आनंद सर्व अहिल्यासैनिकांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.भोजने, उपाध्यक्ष देशमुख,, डॉ.पंडित, डॉ.करडे, डॉ.गाडेकर, डॉ.लांडगे, आडभाई साहेब, डॉ.हंडाळ, डॉ.वीरकर, डोईफोडे, अॅड.पादीर, अॅड.भोजने, डॉ.पिसे, डॉ.पानसरे, प्रा.गवते, प्रा.शेंडगे, तागड साहेब, डॉ.तागड, डॉ.काळे, डॉ.नजन, श्री.राजेंद्र नजन आदिंनी परिश्रम घेतले. आभार भगवान गवते यांनी मानले.