Breaking News

मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड

मुंबई, दि. 08 - हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबईत करण्यात आला असून ही कारवाई मुंबई पोलिसांच्या  समाजसेवा शाखेने केली आहे. या सेक्स रॅकेटमध्ये दोन टीव्ही अभिनेत्रींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
6 जून रोजी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंगच्या  माध्यमातून या सेक्स रॅकेटचा कारभार होत असल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन टीव्ही अभिनेत्री, एक मॉडेल आणि दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले  असून गोरेगाव येथील एका आलीशान मॉल बाहेर त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित मॉडेल आणि अभिनेत्रीचे फोटोही ताब्यात घेण्यात आले असुन हेच  फोटो सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ग्राहकांना पाठवण्यात येत होते असे म्हटले जात आहे.
मुंबई पोलिसांनी भांडाफोड केलेल्या कारवाईत अभिनेत्रींचाही समावेश आहे. यामध्ये एक टीव्ही अभिनेत्री आहे जिने सावधान इंडिया या मालिकेत अभिनय केला  आहे. दुसरी एक मराठी अभिनेत्री असुन तिसरी रँप मॉडेल आहे.