‘मेक इन इंडिया’,‘मेक इन महाराष्ट्र’ नावाखाली दिल्या भूलथापा
पुणे, दि. 08 - भाजपचे 8 आमदार शहरात असून त्यांनी शहरातील कोणते प्रश्न मार्गी लावले? नुसती जाहिरातबाजी करून मते मिळविली आहेत; पण काम कोठेच दिसत नाही. भाजपने कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले. नवीन पिढीला ‘मेक इन इंडिया’,‘मेक इन महाराष्ट्र’ या नावाखाली भूलथापा दिल्या आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला. राष्ट्रवादीची नेहरू मेमोरियल हॉल, घोले रोड येथे बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. या बैठकीला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, माजी महापौर, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार या वेळी बोलताना म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्रितरित्या काम करायचे आहे. गेल्या वर्षात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने जी कामे केली आहेत ती पुणेकरांसमोर मांडली गेली पाहिजेत, त्यांच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजेत. 2017 ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने विविध कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन केले आहे.
आगामी काळात विविध प्रकारच्या आठ कार्यशाळा कायकर्ते व नगरसेवकांसाठी घेण्यात येणार आहेत त्यापैकी किमान सहा कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाच पाहिजे तर त्यांना महानगरपालिकेचे कामकाज कशाप्रकारे चालते हे कळेल. आपल्या पक्षाचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करायचे असे सूत्र आहे. आजचा युवक विकासाच्या कामांना अधिक प्राधान्य देतो. जिथे विकास असेल त्याच पक्षाच्या पाठीशी युवा पिढी उभी राहते. तरुण मतदार जास्त आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करता येणे गरजेचे आहे. त्याचेही प्रशिक्षण आपण कार्यशाळांमध्ये देणार आहोत. इथून पुढील काळात अधिक जोमाने आणि युद्धपातळीवर, राजकीय इच्छाशक्ती मनात ठेवून काम करणे गरजेचे आहे.
व्यक्तिमत्त्व विकास व संभाषण कौशल्य खूप आवश्यक आहे त्यासाठी आपण कार्यशाळांचे आयोजन करणार आहोत. या कार्यशाळेला सर्वांनी आलेच पाहिजे. आपली संघटना मजबूत झाली तर पक्ष मजबूत होतो. मजबूत संघटना कधीच वाया जात नाही त्यामुळे आपण सर्वांनी चांगल्या विचारांनी चांगले काम करून पुढे जाऊ या, असे त्यांनी सांगितले.