मार्डीकरांच्या जलसंधारणाचा अन्य गावांनी आदर्श घ्यावा : मुद्गल
सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) : मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्डीकर दुष्काळाला पराभूत करतील याची मला खात्री आहे. मार्डीकरांनी केलेल्या जलसंधारण कामाचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
माण तालुक्यातील मार्डी येथे लोकसहभाग व प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांची पाहणी जिल्हाधिकारी मुद्गल यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले, तहसिलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी
राजेश जानकर, सरपंच कौशल्या पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ, अॅड. पांडुरंग पोळ, डॉ. दिपक पोळ-पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुद्गल यांनी ग्रामस्थांनी लोक सहभागातून केलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, दोन महिन्यात तब्बल पासष्ट किलोमीटर लांबीची खोल सलग समतल चर काढली एवढं मोठं काम महाराष्ट्रात कुठेही झालं नसेल. खोल सलग समतल चरांमुळे झालेला स्वच्छ पाणीसाठा हे या कामाचे यश आहे. सुरु असलेल्या कामात सातत्य टिकविण्याची आवश्यकता आहे. तरुणांनी जबाबदारी स्वीकारुन नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु झालेली एकजूटीची मोट अधिक घट्ट व्हावी, असेही ते शेवटी म्हणाले.
त्यानंतर शिंदी खुर्द, भांडवली, तेलदरा, मलवडी व शिरवली या गावांना भेट देवून जिल्हाधिकार्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी काही मुलांनी आपल्या खाऊचे पैसे जलयुक्त शिवार योजनेसाठी दिले तर अनेक ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हजारोंच्या देणग्या दिल्या. जलसंधारण कामांच्या पाहणीदरम्यान सर्व मान्यवरांनी खोल सलग समतल चरांमुळे झालेले चांगले परिणाम पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या चरांच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.