बिहार पॅटर्नचा अवलंब केल्यास त्यांचा चांगला परिणाम ः भोसले
अहमदनगर, दि. 07 - वृक्षारोपणाबद्दल प्रत्येकजण आपापल्या परीने भाष्य करतो. मात्र, कृती करताना मागे हटतो. फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण करणारे महाभाग आहेत. सोशल मीडियावरून वृक्षारोपणाचे आवाहन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. प्रत्येकाने फक्त एक झाड लावून ते जगवावेत, एवढीच माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करीत आहे. वृक्षारोपणाची चळवळ व्यापक होण्यासाठी शासन न मनपा स्तरावर अधिक सक्षमपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वृक्षांची संख्या वाढावी, यासाठी बिहार पॅटर्नचा अवलंब केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल, असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी केले.
प्रभाग 30मधील वसंत-तारा कॉलनीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री. भोसले बोलत होते. याप्रसंगी कांचन पटेल, सविता गांधी, सविता शहाणे, सुनीता कटारिया, निर्मला भोळकर, अलका दायमा, प्रकाश कटारिया, डॉ. सतीश शहाणे, तुकाराम वाखुरे, सुभाष दायमा, चंद्रेश पटेल, कॅप्टन सदाशिव भोळकर, किशोर गांधी, पी. आर. फसले, सुखदेव शेडाळे, दत्तात्रेय खराडे उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाले की, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बिहारमध्ये झाडे लावण्याचे काम दिले जाते. हमी योजनेवरील मजुरास झाडे जगवण्याची जबाबदारी दिली जाते. त्यासाठी त्यास मानधन दिले जाते. त्यामुळे वृक्षांची संख्या बिहारमध्ये वाढत आहे. शासनाने बिहार पॅटर्न राबविल्यास पुढील 5 ते 10 वर्षांत झाडांची संख्या वाढल्यास मोठी मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.श्री. वाखुरे म्हणाले की, वसंत-तारा कॉलनीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्री. भोसले यांनी हाती घेतला आहे. यामध्ये सर्वजण मनापासून सहभाग देऊ. झाडे वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असे ते म्हणाले.