Breaking News

विशेष जनजागृती प्रचार अभियानाला सुरवात

अहमदनगर। प्रतिनिधी । 07 - केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीने देशभरात केंद्रातील सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आज पासून तिसगावात वृध्देश्‍वर विद्यालयाच्या प्रांगणात या अभि
यानाला सुरुवात झली असून प्रसिध्द वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी देशाच्या कल्याणासाठी वृक्षरोपण करण्याची गरज व्यक्त करुन प्रत्येकाने या कार्यात स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे न पहाता मुलींना सन्मानाची वागणूक द्या. घरात गावात स्वच्छता ठेवा आणि प्रत्येक घरी स्वच्छतागृह बांधण्याचे वसा घ्या असेही ते म्हणाले. या प्रसंगी रांगोळी स्पर्धा, सकस आहार स्पर्धा आणि सदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील लोकांची आरोग्य दिनांक 7 जून 2016 रोजी या अभियानाचे उद्घाटन राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले, पाथर्डी मतदार संघाच्या आमदार सौ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते होईल. यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे, उपसभापती सौ. बेबीताई केळगंद्रे, जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे, पंचायत समिती सदस्य काशिनाथ पाटील लवांडे, तिसगावच्या सरपंच सौ. विजया लवांडे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रबिनवडे, उप विभागीयअधिकारी ज्योती कावरे, तहसिलदार सुनिता जर्‍हाट, गट विकास अधिकारी अरुण हरिशचंद्रे,जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, वृद्धेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब दारकुंडे, बँक आफ महाराष्ट्रचे सहायक महाव्यवस्थापक सुधीर कुळकर्णी, बँक मित्र व पर्यवेक्षक विनायक पवळेहे उपस्थित या प्रसंगी बँकांच्या योजना, कृषी योजनाची माहिती मान्यवर देणार आहेत. या अभियानाचा लाभ सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधवा जायभाय यांनी केले.