केरळमध्ये सोनिया गांधींविरोधात गुन्हा दाखल
तिरुअनंतपुरम, दि. 08 - एका कन्स्ट्रक्शन कंपनीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह केरळमधील काँग्रेस नेत्यांविरोधात तिरुअनंतपुरममध्ये गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा पैसे थकविल्याच्या कारणावरून दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस नेत्यांविरोधात हा गुन्हा हिथर कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर राजीव यांनी दाखल केला असून, त्यांनी इमारतीच्या बांधकामाचे पैसे थकविल्याचा आरोप केला आहे. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या इमारतीच्या बांधकामाचे कॉन्टॅक्ट हिथर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आले होते. कंपनीने हे बांधकाम पूर्ण केले. मात्र, अद्याप या कंपनीला पैसे देण्यात आलेले नाहीत.
या कंपनीला केरळचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्नीथला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले होते. आता केरळ प्रदेश काँग्रेसकडून फंड नसल्याचे कारण देण्यात येत आहे. या कंपनीने यापूर्वी सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीसही पाठविली होती. पण, नोटीसला उत्तर न दिल्याने राजीव यांनी एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरमध्ये सोनिया गांधींसह रमेश चेन्नीथला, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही. एम. सुधीरन यांच्या नावाचाही समावेश आहे.