रेल्वेमंत्र्यांनीच केली नियमांची पायमल्ली !
मेरठ, दि. 08 - रेल्वे प्रशासनाच्या वतीने नेहमीच चालत्या रेल्वेतून उतरू नये असे सांगितले जाते पण जेव्हा रेल्वे मंत्री चालत्या रेल्वेतून उडी मारून रेल्वे नियमांची करतात तेव्हा या नियमाचे पालन करणा-या जनतेला आश्चर्य वाटल्याशिवाय कसे राहणार. भारतीय रेल्वेच्या अवस्थेत सुधारणा करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणा-या रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनीच मेरठ रेल्वेस्टेशनवर चालत्या रेल्वेतून उडी मारली आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते, रेल्वेचे अधिकारी पाहातच राहिले.
गाजियाबाद-मेरठ-सहारनपूर रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम झाले असून त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रभू मेरठ येथे आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्टेशनवर झालेली गर्दी त्यांनी लांबूनच पाहिली आणि गाडी प्लॅटफॉर्मवर आल्याबरोबर या सत्कार सोहळ्यापासून दूर पळण्यासाठी त्यांनी चालत्या गाडीतून उडी घेतली. वास्तविक तेव्हा रेल्वे धीम्यागतीने चालत होती.चालत्या रेल्वेतून उडी मारुन प्लॅटफॉर्मवरील स्वागत सोहळा टाळून प्रभू थेट मंचावर पोहोचले. मात्र कार्यकर्तेही माघार घेणारे नव्हते.
त्यांनी प्रभुंना मंचावर गाठले आणि गाजियाबाद-मेरठ-सहारनपूरचे विद्युतीकरण केल्याबद्दल प्रभूंचे अभिनंदन केले.सिटी स्टेशन येथे रेल्वे मंत्र्यांनी विद्युतीकरणाचे लोकार्पण केले. त्यासोबतच एसक्लेटर आणि लिफ्टचे भुमीपूजन प्रभूंच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळात जेवढे काम झाले नाही तेवढे गेल्या दोन वर्षांमध्ये झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्याला एनडीए सरकारीच प्राथमिकता असल्याचे प्रभूंनी सांगितले.रेल्वेने दोन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात 4500 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर इस्टर्न फ्रेट कॉरिडॉरसाठी 8500 कोटी रुपये कॅबिनेटने मंजूर केले असल्याचे प्रभूंनी सांगितले.