Breaking News

खडसे संदर्भातला निर्णय अमित शहा घेणार

नवी दिल्ली, दि. 03 - महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली असून खडसेंसंदर्भातला अंतिम निर्णय अमित शहा हेच घेणार असल्याचे समजते. खडसे सध्या जमीन खरेदी व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्याशी फोन संभाषण अशा मुद्द्यावरून चर्चेत आहेत. त्या संदर्भातला सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीस यांना अमित शहा यांनी दिले होते, त्यानुसार हा अहवाल सादर केला गेल्याचे समजते.
खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे मात्र खडसे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. अमित शहा यांच्याकडून मिळालेल्या संकेतांनुसार खडसे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. अमित शहा खडसे यांना मंत्रीपद सोडण्यास सांगतील व तरीही त्यांनी ऐकले नाही तर भाजप मधून त्यांची हकालपट्टी केली जाईल असे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा
च्या ताब्यात असलेली पुण्यातील जमीन खडसे यांनी पत्नी व जावयाच्या नावावर स्वस्तात खरेदी केल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. त्यातच खडसे यांच्यावर दाऊदशी फोनवरून बातचित केल्याचे आरोपही केले जात अ्रसून त्या संदर्भातले पुरावेही सादर केले गेले आहेत. मात्र खडसे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.