दूध खरेदी-विक्रीच्या दरात दोन रुपयांनी वाढ
मुंबई, दि. 29 - उत्पादन खर्चासोबतच वाढणार्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने गाय आणि म्हैशीच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली. राज्यात एक जुलैपासून नवी दूध दरवाढ लागू करण्यात येईल.
राज्यातील बहुतांश दूध उत्पादक हे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. शेतीला पूरक आणि फायदेशीर जोडधंदा म्हणून हा व्यवसाय शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. राज्यातील तब्बल तीस लाख शेतकरी दुधाचे उत्पादन घेतात. मात्र, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारा हा व्यवसाय गेल्या काही दिवसांतील सरकारी धोरणामुळे अडचणीत आला आहे. केंद्र सरकारने दूध भुकटीवरील निर्यात अनुदान बंद केल्याने दुधाचे दर कोसळून शेतकरी अडचणीत होते. दूध संघांनीही गायीच्या दूध खरेदी दरात मोठी कपात करून शेतकर्यांच्या अडचणीत भर टाकली होती. गायीच्या दुधाचा खरेदी दर 24 रुपयांवरून 16 रुपयांपर्यंत खाली आला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उशिरा का होईना गायी आणि म्हशीच्या दूध खरेदीचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गायीचे दूध 22 रुपये आणि म्हशीचे दूध 31 रुपये असे प्रतिलिटर दर करण्यात आले आहेत. राज्यातील दूध दरवाढीच्या या निर्णयानंतरही शेजारील काही राज्यांमध्ये मात्र दुधाच्या खरेदीचे दर यापेक्षाही अधिक आहेत.
दरम्यान, दूध विक्री दरातही दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाचा विक्री दर 33 वरून 35 रुपये प्रति लिटर आणि म्हशीचे दूध 42 रुपयांवरून 44 रुपये प्रति लिटर इतके होणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य विकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या प्रदत्त समितीने दूध दरवाढीसंदर्भात सुचवलेल्या शिफारशी राज्य सरकारने आज स्वीकारल्या.