पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली सामना बरोबरीत
मुंबई, दि. 29 - प्रो-कबड्डीमधील दबंग दिल्लीविरूद्धचा सामना 27-27 अशा बरोबरीत सुटला. मुंबईच्या होम ग्राउंडवर पुणेरी पलटणला दोन विजय एक पराभव आणि एक बरोबरी अशी कामगिरी करता आली.
पहिल्या दोन सामन्यांत दोन विजय मिळवून शानदार कामगिरी करणार्या पुण्याचा खेळ दोलायमान असाच होता. पहिल्या सात मिनिटांत एकही गुण नाही, त्यानंतर दिल्लीवर लोण, मध्यंतराला स्वतःवर लोण आणि त्यामुळे गमावलेली आघाडी, अखेरच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे पराभवाचे सावट; पण दिल्लीच्या मिराज शेखची अखेरच्या चढाईत केलेली पकड, असा खेळ पुण्याकडून झाला.
सामन्याचा निकाल 27-27 असा लागला असला तरी, संपूर्ण सामना चांगलाच चुरशीचा झाला. अखेरची तीन मिनिटे तर थरारक होती. दिल्लीचा संघ 25-23 असा पिछाडीवर असताना त्यांच्या दीपक नरवालने एकाच चढाईत तीन बळी मिळवले. लगेचच दीपक हुडाची पकड केली आणि दिल्लीने 27-25 अशी आघाडी घेतली.
सामना गमावण्याचे संकट उभे असताना पुण्याचा कर्णधार मनजित चिल्लरने चढाईत गुण मिळवला आणि अखेरच्या चढाईत मिराज शेखची पकड केली. या वेळी त्याला दीपक हुडाने साथ दिली. खरे तर ती डूऑर डाय चढाई असल्यामुळे मिराजला गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविक होते.