Breaking News

ब्राम्हणनिती ः तोडा अन् राज्य करा

आठव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत भारतावर ब्राम्हण व मुसलमान राज्यकर्ते व लुटारू सामूहिक अन्याय करत होते. सन 1001 ते 1027 दरम्यान महंमद  गझनीने ब्राम्हण पुरोहितांच्या सल्ल्याने भारतातील मंदिरे लुटली. पुढे मुसलमान राज्यकर्ते झाले. ब्राम्हणांनी मुसलमान शासकांकडे खोजे, मंत्री, कारकून,  प्रधानमंत्री ही पदे मिळवली. तसेच उच्च पदावरील मान, अधिकार व नोकर्‍यांसाठी ब्राम्हणांनी इस्लाम धर्म स्वीकारला. अशा रितीने सन 1001 ते 1707 -  औरंगजेब मृत्यूपर्यंत परकीय मुसलमान इराणी, इराकी, तुर्की, अफगाणी, सिद्दी, हबशी, बलूची या राज्यकर्त्यांसोबत ब्राम्हणांनी जुळवून घेतले. थोडक्यात,  मुसलमान बादशहा व ब्राम्हण नोकरशाही यांच्या अभद्र जोडीने बहुजनांना अत्यंत लुटले. ब्राम्हणांना मुसलमान बादशहांचा पाठिंबा होता. मुसलमान बादशहा. तर  ब्राम्हणांची मनुस्मृतीनुसार धर्मसत्ता होती. यासाठी ब्राम्हणांनी मुसलमानांना पूर्ण मदत केली. मराठा यादवांचे साम्राज्य सन 1297 मध्ये ब्राम्हण मंत्री हेमांद्री पंडिताने  देवगिरीवर फितुरी करून अल्लाउद्दीन खिलजीस मिळवून दिले. तर 23 जानेवारी 1565 रोजी विजयनगरचे मराठा साम्राज्य बुडवले.
तसेच मुसलमान शासकांनी ब्राम्हणांचे सर्व धार्मिक अधिकार मान्य करून त्यांना हिंदू धर्माचे मालक ठरविले. मनुस्मृती जिवंत ठेवली. म्हणून मुसलमान  राज्यकर्त्यांच्या काळातील हिंदू बहुजनांवरील अन्याय हे ब्राम्हणांचे धार्मिक अन्याय होते. मुसलमान राज्यकर्ते हिंदू प्रजेच्या जीवनात हस्तक्षेप करत नव्हते. त्यामुळे  बहुजन हिंदूसाठी सर्वेसर्वा शासक हे ब्राम्हण मंत्रीच होते. म्हणून याच ब्राम्हण मंत्र्यांनी अनेकदा स्वतःच्या राजाविरोधात राजद्रोह करून आपले ब्राम्हणस्थान  बळकट केल्याचा इतिहास आहे. अशा प्रकारे मुसलमान राजवट क्रुर नव्हती. मुसलमान बादशाहाही क्रूर नव्हते. प्रत्यक्षात ते क्रूर होते, ते ब्राम्हण नोकरदारच.  आणि ब्राम्हण धर्मपुरोहित. अशाप्रकारे सतराव्या शतकापर्यंत ही एकतर्फी ब्राम्हणशाही इस्लामच्या आश्रयाने कर्मठ झाली. सातशे वर्षे ब्राम्हणांनी हिंदूंना लुटले.
सन 1640 च्या दशकात संत तुकाराम महाराजांनी समाज प्रबोधनातून वारकर्‍यांचे धारकरी बनवण्यास सुरूवात केली. त्याचवेळी शहाजी महाराज व जिजामाता  यांनी बालशिवबास पुणे जहागिरीवर स्वतंत्ररित्या नेमणुक दिली. यातून स्वराज्याचे बीजारोपण होऊन स्वराज्य निर्माण झाले. आणि रामदास स्वामीसारख्या ब्राम्हण  गोसाव्याने आदिलशहाच्या आश्रयाने शिवरायांना विरोध करण्यास सुरूवात केली. त्यासाठी वैदिक धर्माचे अस्त्र व शस्त्र वापरले. सर्व ब्राम्हण शिवरायांविरोधात  एकत्र येऊन त्यांनी सामूहिक विरोध केला. त्यासाठी मोगल बादशहा औरंगजेबास शिवरायांना मारण्यात यश यावे यासाठी सासवडजवळ 1665 मध्ये 400 ब्राम्हण  एकत्र जमले. शिवाजीस मृत्यू यावा यासाठी कोटीचंडी यज्ञ केला. राजपूत मिर्झाचे जयसिंगाची निवड बादशहाने यासाठी धूर्तपणे केली होती. दुर्दैवाने यज्ञ करूनही  शिवाजी जिवंतच राहिला. पण ब्राम्हण म्हणाले यज्ञामुळे शिवाजी अटकेत सापडले. हे सर्व ब्राम्हणांचे विरोध मोडून काढत संत तुकाराम महाराज व छत्रपती  शिवाजी महाराज ब्राम्हणांविरोधात लढत राहिले. प्रतिक्रांती वरचढ ठरली व ब्राम्हणांनी सन 1650 मध्ये संत तुकारामांची तर सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी  महाराजांची हत्या घडवून आणली. या दोन्ही हत्या समर्थ रामदास स्वामी नावाच्या देशस्थ ब्राम्हण गुरूनेच घडवून आणल्याचे इतिहास सांगतो. यानंतर छत्रपती  संभाजी महाराज हत्या 11 मार्च 1689, छत्रपती राजाराम महाराज- हत्या 2 मार्च 1700, महाराणी ताराराणी - पदच्युत सन 1708, छत्रपती शाहू महाराज मृत्यू  सन 1749, अल्पवयीन छत्रपती दत्तक पदभार सन 1750... पेशव्यांनी छत्रपती शाहूकडून कारस्थानाने सर्व हक्क मिळवून तसे आदेश प्राप्त करून घेतले होते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1674 मध्ये शिवराज्याभिषेक करून एका चळवळीचा पाया घातला, परंतु रामदासाच्या रूपाने त्याकाळी आदिलशहाच्या गोटात  एक ब्राम्हण प्रतिचळवळ चालवत होता. याच रामदासाने दि. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची विषप्रयोगाने हत्या घडवून आणली. तर 1 फेब्रवारी  1689 रोजी रामदासांनी छत्रपती संभाजी  राजांना मोगलांहाती पकडून दिले. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला.  प्रतिक्रांतीने अशा प्रकारे क्रुर रूप धारण केले. रामदास या अत्यंत अहंकारी ब्राम्हणाने हे सारे घडवून आणले.
यानंतर छत्रपती राजाराम व छत्रपती ताराराणी यांनी स्वराज्य सांभाळले व वाढवलेही. दरम्यान 20/2/1707 रोजी औरंगजेब बादशहा मरण पावला. मराठा  साम्राज्यावर महाराणी ताराराणींचा कारभार होता. ताराराणींनी ब्राम्हणांना खड्यापेक्षा दूर ठेवले होते. मोगलांकडील ब्राम्हण मंत्र्यांनी शंभूपुत्र शाहूराजांस कैदेतून  सोडण्याचा सल्ला दिला. वारसाच्या वादातून शाहूराजा छत्रपती झाले (सन 1708) सातारा आणि त्यांना नव्या ब्राम्हणांनी घेरले. ताराराणीस सर्वत्र मुख्य कारभार व  अधिकारापासून दूर ठेवले. 1749 मध्ये शाहूराजांचा मृत्यू झाला. तोपर्यंत सर्वच मराठेशाही ब्राम्हण पेशव्यांनी पूर्ण घशात घातली होती. एवढेच नाही तर भारतभर  पसरलेल्या भोसले, दाभाडे, शिंदे, होळकर, गायकवाड, मोहिते, माने, निंबाळकर, पवार, जाधव, महाडिक, पायगुडे असा अनेक मराठा सरदारांमध्ये दुश्मनी निर्माण  करण्यात पेशवे यशस्वी ठरले. त्यामुळे ‘तोडा व राज्य करा’ ही ब्राम्हणी नीती उपयुक्त ठरली. हा इतिहास इथे पुन्हा मांडण्याचे प्रयोजन इतकेच की तोडा व राज्य  करा ही ब्राम्हणनिती आजही सुरू आहे. स्वराज्यनिर्मित खोडा घालणार्‍या या ब्राम्हणशाहीने मुघलांशी मैत्री केली तर आजच्या काळात देखील या प्रवृत्ती वेगवेगळ्या  रूपाने आपले काम करीत आहेत.