द. आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर विजय
गयाना, दि. 08 - दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत कगिसो रबाडा आणि फरहान बेहारदीन यांच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियावर 47 धावांची विजय मिळविल्यामुळे दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या स्थानावर गेले आहे.
दक्षिण आफ्रिका फलंदाजी कठीण असलेल्या गयानातील या स्टेडियमवर सुरवातीला फलंदाजी करताना फक्त 189 धावा बनवू शकले होते. पण, या धावसंख्येसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 142 धावांत संपुष्टात आला. या विजयसह दक्षिण आफ्रिकेने बोनस गुण मिळविला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंचने 72 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून फक्त तीन खेळाडूच दुहेरी धावसंख्या करु शकले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज रबाडाने 13 धावांत तीन बळी घेतल्याने ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आल्यानंतर फरहान बेहारदीनने केलेल्या 62 धावांच्या खेळीमुळे त्यांना 189 धावांपर्यंत मजल मारता आली होती. हाशिम आमलाने सलामीला केलेली 35 धावांची खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी उपयुक्त ठरली. बेहारदीनला सामन्याचा मानकरी म्हणून निवडण्यात आले.