झिम्बाब्वे दौ-यासाठी टीम इंडिया रवाना
मुंबई, दि. 08 - झिम्बाब्वे दौ-यासाठी भारतीय टीम रवाना झाली असून पहाटे 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन झिम्बाब्वेसाठी प्रस्थान केले. प्रामुख्याने नवख्या खेळाडूंना झिम्बाब्वे दौ-यासाठी संधी देण्यात आली असून महेंद्रसिंह धोनी वगळता एकही अनुभवी खेळाडू टीम इंडियामध्ये या दौ-यासाठी नाही. झिम्बाब्वेमधील दौ-यात टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.
टीम इंडियामध्ये महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे.
असा आहे झिम्बाब्वे दौरा
पहिला एकदिवसीय सामना - 11 जून, 2016
दुसरा एकदिवसीय सामना - 13 जून, 2016
तिसरा एकदिवसीय सामना - 15 जून, 2016
पहिला टी-20 सामना - 18 जून, 2016
दुसरा टी-20 सामना - 20 जून 2016
तिसरा टी-20 सामना - 22 जून 2016