बाजार समितीच्या जाचातून शेतकरी मुक्त
आता शेतमालाची थेट विक्री करणे शक्य !
मुंबई, दि. 28 - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाची होणारी विक्रीच्या जाचातून शेतकर्यांची मुक्तता करण्याचा महतवपुर्ण निर्णय राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंगळवारी घेण्यात आला असून, त्याबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. यामुळे शेतमालाची थेट विक्री करणे शेतकर्यांना शक्य होणार आहे. याआधी शेतक़र्यांना बाजार समितींच्या आवारामध्येच शेतमालाची विक्री करावी लागत असे.राज्य सरकारने भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा या जीवनावश्यक वस्तूंना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाचातून नियंत्रणमुक्त केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेला दलालांचा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारने भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा या जीवनावश्यक वस्तूंना नियंत्रणमुक्त केले आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतक़र्यांना यापुढे आपला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत जाऊन विकता येणार आहे.