Breaking News

निसर्गाची संस्कृती !

कधी नव्हे ते या वर्षी तापमानवाढीने उच्च पातळी गाठली आहे. त्यामुळे आपल्याला विचार करणे भाग आहे, मात्र आपल्यावर भोगवादाची संस्कृती प्रबळ आहे. आपण निसर्गाचे बदलते स्वरूप समजून घेत नाही. जगभरात वाढते जलवायु परिवर्तन आपल्यापुढे समस्या बनली आहे. कार्बन उत्सर्जन आव्हान बनले आहे. मात्र आपण याबाबत जास्त पुढाकार घेऊ शकलो नाही. आपला विकासवादी दृष्टिकोन आपल्याला विनाशाकडे ढकलत आहे. ग्लोबल वामिर्ंगमुळे पृथ्वी गरम होत आहे. निसर्गाची संस्कृति बदलत आहे. याचे कारण मानव आहे. आम्हाला आपल्या विज्ञानावर पूर्ण विश्‍वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू. मात्र माणूस हे विसरत आहे की, जिथे त्याचा शोध संपतो निसर्ग तेथून आपली सुरूवात करते. जगभरात ग्लोबल वामिर्ंगचे सत्य आपल्यापुढे येऊ लागले आहे. माणसाचा भौतिक आणि विकासवादी दृष्टीकोन त्याला अडचणीत आणत आहे. विकासाचे धृतराष्ट्री धोरण आपल्याला निसर्ग आणि माणूस यांच्यात होणार्‍या अघोषित महाभारताकडे नेत आहे. निसर्गाविरोधात माणूस आणि त्याचे विज्ञान ज्याप्रकारे युद्ध छेडत आहे त्याचा परिणाम भयंकर असेल. भौतिक विकासाची रणनीति माणसाचे अस्तित्व संपवील. आपण आंधळ्या विकासाच्या शर्यतीत निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी ठरत आहोत. निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणासाठी बनविलेला कायदा फक्त पुस्तकातच राहिला आहे. ओझोन थरातील छिद्रामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कार्बन उत्सर्जनावर आपण विराम लावू शकत नाही आहोत. परिणामी दरवर्षी तापमान वाढत आहे. भारतात वेगाने जलवायु परिवर्तन होत आहे. कधी दुष्काळ, कधी पूर यासारखे संकट आपल्यापुढे येत आहेत. हा चिंतेचा विषय आहे. आपण ग्रीन हाउस गॅसेसच्या उत्सर्जनाबाबत बोलत असू तर जगभरात फक्त 10 देश, यात चीन, अमेरिका, यूरोपिय देश, भारत, रशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कनाडा, जपान असे देश 70 टक्के ग्रीन हाउस गॅसेचे उत्सर्जन करतात. 57 टक्के कार्बन डॉयऑक्साइड कोळशातून उत्सर्जित होतो, तर जैव ईंधनातून हा 17 टक्के होतो. शिवाय 14 टक्के मिथेन, 8 टक्के नाइटेट ऑक्साइड आणि उर्वरित गॅसेस यात समावेश आहे. याचा पूर्णपणे आपल्या ग्रीन हाउसवर प्रभाव पडत आहे. 100 वर्षांपासून पृथ्वीच्या तापमानात 0.8 टकके वाढ नोंदविली आहे. यातही 0.6 डिग्री सेल्सियसची वाढ 30 वर्षात झाली आहे. कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत भारत तिसर्‍या स्थानी आहे. एकटा चीन जगातील 11 बिलियन टन कार्बन उत्सर्जित करतो. चीन भारतापेक्षा चौपट आणि अमेरिकेपेक्षा दुप्पट कार्बन उत्सर्जन करतो. कार्बनचा प्रभाव रोखण्याची गरज आहे. भारत याबाबत मागे आहे. कारण येथे 24 टक्के जंगल आहे, रशियाकडे 45 आणि जपानकडे 67 टक्के जंगल आहे. त्याचा थेट परिणाम दिसत आहे. हे परिवर्तन आपल्या कृषि आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम करीत आहे.  देशातील 13 शहरे जगातील सर्वात प्रदूषित शहरांत येतात. ग्लोबल वामिर्ंगच्या मागे 80 टक्के जलवायु परिवर्तन हेच मुख्य कारण आहे. मात्र ही समस्या थांबणार नाही. माणूस जर निसर्गाशी तळमेळ राखू शकला नाही तर त्याचे अस्तित्व नष्ट होईल. निसर्गाचा इशारा आपण ओळखला पाहिजे. ग्लोबल वामिर्ंगमुळे ग्लेशियर वितळत आहेत. समुद्राची पातळी वाढत आहे. जमीनीतील पेयजल घटत आहे. भूकंप, पूर, दुष्काळ, भू-स्खलनानंतर आता उष्णतेची लाट आपले अस्तित्व नष्ट करण्यास सज्ज आहे. निसर्गाच्या प्रकोपाचे सर्वात मोठे उदाहरण आपल्यापुढे पुणे येथील माळीण गाव आहे. येथे गतवर्षी डोंगर कोसळून अख्खे गाव गाडले गेले. नेपाळमध्ये आलेला भूकंपही आपण पाहिला आहे. निसर्ग आपल्या तांडवाने वारंवार इशारा देत आहे. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. औद्योगिक संस्था, रस्ते, पुल आणि शहरीकरणामुळे जंगलाचा सफाया होत आहे. वनभूमि विस्तार घटत आहे. राष्ट्रीय महामार्ग निर्माणासाठी आंबा आणि इतर जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्याचा परिणाम पृथ्वीचे तापमान वाढण्यात होत आहे. माणसाने आपल्या चुकांमुळे निसर्गाशी अघोषित युद्ध पुकारले आहे. या लढाईत अखेर माणूसच पराभूत होत आहे, निसर्ग विजयी होईल. मानव स्वतःला बुद्धिशाली आणि कौशलयुक्त समजतो. त्याने आपल्या विकासवादी विचाराच्या जोरावर निसर्ग आणि त्याच्या कृतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. हीच त्याची मोठी चूक आहे. निसर्गावर आपण विजय मिळवू शकत नाही. आपल्याला विज्ञान आणि विकासासह निसर्गाशी सामंजस्य स्थापित करावे लागेल. आपण असे करू शकलो न नाही तर येणारा काळ माणसासाठी खूप वाईट असेल. पूर, दुष्काळ, सूनामी, हिम, भू-स्खलन अशा नैसर्गिक संकटांशी आपल्याला लढत राहावे लागेल. जलवायु परिवर्तन आपला नाश करील.