Breaking News

समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे

। आ. अरुण जगताप यांच्या निधीतून समाजमंदिराचे काम सुरू ः महापौर कळमकर 
 अहमदनगर, दि. 02 - कजबे मळा परिसरात समाजमंदिराची उभारणी होत आहे. त्याचा अनेकांना चांगला उपयोग होऊ शकतो. आ. अरुण
जगताप यांच्या निधीतून हे काम पूर्ण होत आहे. धनगर समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे. भव्य असे हे समाज मंदिर लवकरच उभे राहील. उपनगराच्या मध्यवर्ती भागात हे समाज मंदिर उभारले जात आहे. समाजाच्या हितासाठी सर्वजण एकजुटीने काम करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
कजबे मळा येथे आमदार अरुण जगताप यांच्या निधीतून समाजमंदिराच्या कामाचे भूमिपूजन महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जि. प. सदस्य सचिन जगताप. राजेंद्र तागड, काका शेळके, शिवाजी चव्हाण, सचिन डफळ, संपत बारस्कर, मच्छिंद्र शिपणकर, विजय शिपणकर, भास्कर भोजने, विष्णू तागड, नवनाथ तागड, भाऊसाहेब कजबे, राजू नजान, रावसाहेब सोर, बाळासाहेब घोडके, ज्ञानेश्‍वर घोडके, प्रा. बाळासाहेब शेंडगे, संतोष तागड, विनोद पाचारणे, राजू मोकाशी, गोरक्ष शिंदे, अशोक गावडे, बबन डोईफोडे, चंद्रकांत फणसे, सुभाष फणसे, संतोष कजबे, सुभाष पाचारणे, अतुल लभाते आदी उपस्थित होते. कळमकर पुढे म्हणाले की, धनगर समाजाने अनेक दिवसांपासून समाज मंदिर उभारण्याची मागणी अनेकांकडे केली. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. आमदार जगताप यांनी तातडीने यासाठी निधी उपलब्ध करून देत कामही सुरू केले. या ठिकाणी अनेक छोटे मोठे कार्यक्रम सर्व समाजबांधवांना घेता येतील, असे ते म्हणाले.राजेंद्र तागड म्हणाले की, भिस्तबाग चौकाचे पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर चौक असे नामकरण करण्यात आले, तसेच होळकर यांच्या जयंतीदिनी समाज मंदिराचे कामही सुरू करण्यात आले. ही आमच्या सर्वांची दृष्टीने आनंदाची व भाग्याची गोष्ट आहे. अथक प्रयत्नांनंतर आम्हा सर्व बांधवांना मिळालेले हे फळ आहे, असे आम्ही मानतो. भव्य अशा समाज मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यानंतर या भागाला शोभा येणार आहे. स्वतः उभे राहून दर्जेदार काम करून घेतले जाईल. या कामी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे ते म्हणाले.