Breaking News

अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात जिल्ह्याचा दुसरा क्रमांक

बुलडाणा, दि. 18 - 23 मे ते 26 मे या दरम्यान अमरावती ग्रामीण येथे अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात साईटिफिक एड, पोलीस फोटोग्राफी, अ‍ॅन्टी सॅबॉटेज चेक, कॉम्पुटर अवेअरनेस, डॉग स्कॉड, क्रिमीनल लॉ, लेबलींग व पॅकींग, पोलीस पोटेक्ट अशा विविध प्रकारामध्ये अमरावती परिक्षेत्रातील 5 जिल्ह्याच्या पोलीस संघांनी सहभाग नोंदविला होता.
पोलीस अधिक्षक संजयकुमार बावीस्कर व अपर पोलीस अधिक्षक बुलडाणा
श्रीमती श्‍वेता खेडकर,अपर पोलीस अधिक्षक खामगाव यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली बुलडाणा संघाची निवड करण्यात आली. सदर संघाचे संघ प्रमुख म्हणून पोनि.एस.बी.शिंदे पोस्टे. खामगाव ग्रामीण यांचे नेतृत्वात सपोनी. एस.पी.पाटील, एस.एम.बनसोडे व 14 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
सदर स्पधें दरम्यान विविध स्पधेंमध्ये  तृतीय क्र. मेडीको लिगल पो.नि.एस.बी.शिंदे, प्रथम क्र. क्रिमीनल लॉ व द्वितीय क्र.मेडीको लिगल ओरल स.पो.नि.एस.पी.पाटील, द्वितीय क्र.लेबलींग व पॅकींग  तृतीय क्र.क्राईम सिन फोटोग्राफी स.पो.नि. एस.एम. बनसोडे, द्वितीय क्र.पोलीस पोस्टन्न्ेटऋ पोना/441 प्राणलिंग घोडेस्वार, तृतीय क्र. पोलीस व्हिडीयो ग्राफी पोना/398 महेश पाटील, प्रथम श्‍वान हस्तक प्रथम क्र. एक्सप्लोजीव चेकपोना/668 संतोष जमधडे, द्वितीय श्‍वान हस्तक प्रथम क्र. एक्सप्लोजीव चेक एएसआय/727 साहेबराव शिंदे, तृतीय क्र.ए.एस.चेक पोना/361 प्रशांत शास्त्री, तृतीय क्र.कॉम्प्युटर अवेरनेस पोकॉ/1015 पवन मखमले या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे विशेष पारितोषीक पटकावले आहे. एंकदरीत सांधिक कामगिरी बाबत द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक पटकाविल्याने पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी संघातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करुन त्यांना प्रोत्साहनपर बक्षीसे दिले आहे.