Breaking News

कराडला 12 ऑगस्टपासून कन्यागत पर्वकाल

सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : उज्जैन येथे गंगा नदीकाठी संपन्न होत असलेल्या सिंहस्थ पर्वकाळानंतर अत्यंत भाग्यशाली व पुण्यकारी कन्यागत पर्वकाल 12 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या काळात कराडच्या कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर पवित्र स्नानासाठी हजारो साधू, संत, भाविक येणार असून या काळात कराड कन्यागत महोत्सव समितीचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ. विनायक गरुड यांनी दिली.
वर्षभर होणार्‍या या कार्यक्रमास श्री. श्री. रविशंकर, योगगुरु रामदेवबाबा, उज्जैनचे अवधेशानंद महाराज, करवीर शंकराचार्य यांची विविध कार्यक्रमांना उपस्थिती राहणार आहे. गुरु हा ग्रह प्रत्येक राशीत 13 महिने असतो. तो ज्यावर्षी कन्या राशीत राहतो. ते कन्यागत पर्व समजले जाते. पर्वकाळात गंगा नदी कृष्णा नदीला भेटायला येते व कृष्णा गंगास्वरुप होते. त्यानिमित्त मुख्य समारोहाच्या अनुषंगाने कृष्णा नदीची आरती 5 जून ते 14 जून अखेर सायंकाळी 6.30 वाजता आयोजित केली आहे. वर्षभर चालणार्‍या कन्यागत महोत्सवाला सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा सौ. संगीता देसाई, उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे. कराडवासियांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.