मलकापूर येथे भव्य बुध्द जयंती सोहळ्याचे आयोजन
मलकापूर, दि. 29 - जयभिम मित्र मंडळ याचे विद्यमाने दि 30 मे रोजी मलकापुरात भव्य बुध्द जयंती सोहळा व जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजित करण्यात आलेल्या भव्य बुध्द जयंती सोहळा व जाहिर सभेच्या अध्यक्षस्थानी पिरीपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे हे राहणार असुन प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पिरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा.जोगेंद्र कवाडेसर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विषेश उपस्थिती म्हणुन महसुल मंत्री तथा पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे हे उपस्थित राहणार आहेत तर आमदार चैनसुख संचेती, आरपीआय विदर्भ प्रदेश महासचिव सु.मा.शिंदे, डॉ.अरविंद कोलते, माजी आमदार वसंतराव शिंदे, दिलीपभाऊ देशमुख, हाजी रशिदखॉ जमादार, विजयराव जाधव, नारायणदास निहलाणी, नगराध्यक्षा सौ.मंगलाताई पाटील, किशोरभाऊ नवले, अरूणभाऊ अग्रवाल, देवेंद्र वानखेडे, शिवराज जाधव, अॅड.मजीद कुरेशी, राजाभाऊ कंडारकर, सनाउल्ला जमादार, राजु पाटील, गजानन ठोसर, सिध्दार्थ झनके, यांची उपस्थिती लाभणार आहे. या आयोजित कार्यक्रमा मध्ये सकाळी 9 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील बुध्द विहारात धम्मवंदना, दुपारी 4 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासुन भिक्षु संघासह भगवान बुध्दांच्या मुर्तीची भव्य मिरवणुक, सायंकाळी 5 वाजता सार्वजनिक वाचनालयामध्ये जाहिर सभा व मिरवणुकीचे विसर्जन त्यानंतर टि.व्ही.गायक अनिरूध्द वनकर यांचे भावगीते, बुध्द व भिम गितांचा कार्यक्रम राहिल. या कार्यक्रमाप्रसंगी मराठी सिनेअभिनेत्री दिक्षाताई इंगळे यांना दलित व बहुजन चळवळीत योगदान दिल्या बद्दल मंडळाच्या वतीने बुध्द भुषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
या सोहळा व जाहिर सभे मध्ये बौध्द उपासक उपासिका तथा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पिरिपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे तथा जयभिम मित्र मंडळाचे कुणालदादा सावळे, गजानन तायडे, सुरेश अवसरमोल, रवि गव्हांदे, मिलींद शिंदे, मिलींद हेलोडे, गणेश तायडे, विवेक साबळे, संघर्ष सुरडकर, यांनी केले आहे.